PM Narendra Modi 74th Birthday Agrowon
ॲग्रो विशेष

Subhadra Yojana : वाढदिवसाच्या औचित्यावर मोदींनी सुरू केली सुभद्रा योजना, महिलांना मिळणार वार्षिक १०,००० रुपये

Aslam Abdul Shanedivan

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मंगळवारी (ता.१७) ७४ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने ओडिशा सरकराने महिलांसाठी नवी योजना सुरू केली. या योजनेचे नाव सुभद्रा योजना असून महिलांना वर्षभरात १० हजार रुपये दिले जाणार आहेत.

ओडिशा सरकारने राज्यातील महिलांसाठी सुभद्रा योजना सुरू केली आहे. या योजनेतून २१ ते ६० वर्ष वय असलेल्या महिलांना सरकार दरवर्षी १०,००० रुपये थेट बँक खात्यावर देणार आहे.

ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी याबाबत माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या औचित्यावर ही योजना सुरू केली आहे. ती भगवान जगन्नाथ यांची बहीण देवी सुभद्रा यांच्या नावावरुन सुरू केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

कसे मिळणार पैसे?

ओडिशा सरकारने सुभद्रा योजना पाच वर्षांसाठी सुरू केली असून ती २०२८-२९ पर्यंत असणार आहे. या योजनेचा पहिला हप्ता आंतरराष्ट्रीय महिला दिनी तर दुसरा हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी दिला जाणार आहे. या योजनेसाठी सरकारने ५५ हजार ८२५ कोटींच्या निधीची तरतूद केली आहे.

कोण करू शकतं अर्ज?

सुभद्रा योजनेसाठी ओडिसा राज्याचीच महिला अर्ज करू शकते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा किंवा राज्य अन्न सुरक्षा योजनेचा शिधापत्रिकेत अर्ज करणाऱ्या महिलेचे नाव असावे. तर उत्पन्न २.५० लाखांपेक्षा जास्त नसावे. वय २१-६० वर्षे असावे.

ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज

सुभद्रा योजनेसाठी महिला ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्जासाठी सुभद्रा पोर्टलचा वापर करावा. तर ऑफलाईन अर्ज स्थानिक बँका, पोस्ट ऑफिस आणि सामान्य सेवा केंद्रांमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहेत.

कागदपत्रे कोणती लागतील

आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, जन्म प्रमाणपत्र, बँक खाते तपशील, पत्त्याचा पुरावा, सामाजिक श्रेणीचे तपशीलासाठी जात प्रमाणपत्र, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT