Urea Shortage  Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer : युरिया ‘रेक’ची माहिती देण्याचे कंपन्यांवर बंधन

Urea : कृषी आयुक्तालयाच्या निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालक विकास पाटील यांनी युरिया वितरणाबाबत राज्यस्तरीय नियोजन केले आहे.

मनोज कापडे

Nashik News : रेल्वे वाघिणीतून (रेक) आलेल्या युरियाचे वाटप कोणत्या भागात, कसे होणार आहे, याची आगाऊ माहिती कृषी विभागाला पाठविण्याची सक्ती खत कंपन्यांना करण्यात आली आहे. कृषी आयुक्तालयाच्या निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालक विकास पाटील यांनी युरिया वितरणाबाबत राज्यस्तरीय नियोजन केले आहे.

कोणत्या कंपनीकडून खताचा रेक कोणत्या मालधक्क्यावर कधी पाठविला जाणार आहे, मालधक्क्यावरील खताची वाहतूक कोण करणार, कोणत्या गावाला किती प्रमाणात खत पाठवले जाणार, याची माहिती पुरविण्याचे बंधन कंपन्यांवर टाकण्यात आले आहे. त्यामुळे हेतुतः टंचाई करणाऱ्यांवर नजर ठेवली जाते. तसेच, युरियाचा काळाबाजार नियंत्रणात येत आहे, असा दावा गुणनियंत्रण विभागाने केला आहे.

कृषी विभागाने खताच्या वितरणासाठी यंदा तालुकानिहाय नियोजन करण्याच्या सूचना प्रत्येक जिल्ह्याला दिल्या आहेत. गेल्या तीन वर्षांतील प्रत्येक तालुक्यात ग्रेडनिहाय असलेली खतांची विक्री व यंदाचा अंदाज असे दोन्ही मुद्दे घेत प्रत्येक तालुक्याला किती खत लागेल, याचे नियोजन करण्यात आले आहे.

तालुकानिहाय खतवितरणाचे नियोजन न केल्यामुळेच शेतकरी व लोकप्रतिनिधींकडून तक्रारी येतात. त्यामुळे रेल्वे रेकने आलेली खते फक्त जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी किंवा मालधक्क्याच्या आसपास असलेल्या तालुक्यांमध्येच वितरित केली जाणार नाहीत, याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना कृषी आयुक्तालयाने दिल्या आहेत.

राज्याच्या अनेक भागात खत विक्रेत्यांकडून खते विकताना शेतकऱ्यांची पार्श्वभूमी तपासली जात असल्याचे आढळून आले आहे. शेतकरी जर या विक्रेत्याकडून बियाणे किंवा कीटकनाशके खरेदी करीत नसल्यास त्याला खत देण्यास नकार दिला जातो. हा प्रकार लिंकिंग श्रेणीत मोडणारा असून अशा विक्रेत्याच्या विरोधात कडक कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कृषी सहायक असणार संपर्क अधिकारी

राज्यातील प्रत्येक कृषी सहायकाला त्याच्या कार्यक्षेत्रातील परवानाधारक खत विक्री दुकानांसाठी संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त करावे. जिल्ह्यात प्राप्त होणाऱ्या खतांची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्याने वेळोवेळी जाहीर करावी, अशाही सूचना कृषी विभागाने दिल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT