Cotton Fertilizer  Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer From Cotton : कापसाचा सूक्ष्म कचरा मिळवून देणार पौष्टिक खत

Cotton Farming : देशात कापसाच्या स्पिनिंग प्रक्रियेदरम्यान दोन लाख टन मायक्रो डस्ट, अर्थात सूक्ष्म कचरा (विलो डस्ट) निघते. त्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली जात नाही.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : देशात कापसाच्या स्पिनिंग प्रक्रियेदरम्यान दोन लाख टन मायक्रो डस्ट, अर्थात सूक्ष्म कचरा (विलो डस्ट) निघते. त्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली जात नाही. परिणामी, पर्यावरण विषयक धोके वाढतात. ही बाब लक्षात घेत नागपुरातील केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेने (सिरकॉट) कापसातील या टाकाऊ घटकांपासून जैविक खत निर्मितीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

देशात सुमारे १३० लाख हेक्‍टर, तर महाराष्ट्रात सुमारे ४२ लाख हेक्‍टरवर कापसाचे लागवड क्षेत्र आहे. कापसावर स्पिनिंग प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणावर सूक्ष्म कचरा निघतो. हा कचरा नाकाद्वारे फुफ्फुसात जाऊन कामगारांच्या आरोग्यावर परिणाम होतो. कारखानदारांकडून देखील या पर्यावरणाला घातक अशा या कचऱ्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावली जात नाही.

उघड्यावर फेकून दिल्याने किंवा जाळल्याने धोके उत्पन्न होतात. त्यामुळे संशोधन संस्थेने या कचऱ्यापासून जैविक खत उत्पादन करण्याचे तंत्र विकसित केले आहे. यातील ‘सेल्युलोज’ला खतात परिवर्तित करता येणे शक्‍य आहे. त्यासह संस्थेने काही सूक्ष्मजीव शोधून काढले.

यात शेणाचाही वापर करण्यात आला आहे. याद्वारे नायट्रोजन १५ः१ उपलब्ध होतो. जैविक खत म्हणून याचा वापर करता येणे शक्‍य आहे. संस्थेचे संचालक डॉ. एस. के. शुक्‍ला, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. के. पंडियान यांच्या नेतृत्वात हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.

...असे आहेत खताचे फायदे

- झाडांच्या वाढीसाठी पोषक

- जमिनीतील फॉस्फेट सहजगत्या झाडाला मिळते

- पर्यावरणातील धोके टाळता येतात

- मातीचे आरोग्य राखणे शक्‍य

- सूक्ष्म जिवांची संख्या वाढते.

...अशी करा प्रक्रिया

कापसाच्या कचऱ्याचा ओलावा ६० टक्के, शेण २५ टक्‍के, मायक्रोबॉयल कॉस्ट्रोरीयम (सूक्ष्मजीव) १ टक्‍का हे एकजीव करून त्याचा ढीग करावा. हा ढीग त्याच अवस्थेत ३० दिवस ठेवावा. त्यानंतर पालटून पुन्हा ३० दिवस ठेवावा. याप्रमाणे ६० दिवसांत उत्तम प्रतीचे जैविक खत तयार होते.

...असे आहे अर्थकारण

एक टन कापसाच्या कचऱ्यापासून ७०० किलो कंपोस्ट उपलब्ध होतो. काही प्रमाणात कार्बन उडून जाते. त्यामुळे हे प्रमाण कमी राहते. मजूरीसह एकत्रित तीन हजार रुपयांचा खर्च होतो. उत्पादित जैविक खताला १० रुपये किलोचा दर मिळाल्यास ७०० किलो कंपोस्टपासून ७००० रुपये होतात. चार हजार रुपयांचा निव्वळ नफा होतो.

व्यावसायिक उत्पादनासाठी करार

‘सीआरकॉट’ने विकसित केलेले हे तंत्रज्ञान व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध करून दिले आहे. त्याकरिता पहिल्या टप्प्यात पीआरबी टेक्स्टाइल इंडिया प्रा. लि. कळमेश्‍वरशी (नागपूर) सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उद्योजकाने जैविक खत उत्पादनात सातत्य राखले असून, याला चांगली मागणी असल्याचा दावा त्याने केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT