Mahad Water Crisis: महाड शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर शहराला सध्या नडगाव येथील दगडखाणींमधून दररोज बारा लाख लिटर पाणी पुरवण्यात येत आहे. या खाणींतील प्रचंड पाणीसाठ्याचा विचार करता, येथून महाड शहरासाठी पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार असल्याची घोषणा रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी शुक्रवारी (ता. १२) केली..ज्या खाणीमधून शहराला पाणीपुरवठा करण्यात येत आहे, त्या खाणीला मंत्री गोगावले यांनी भेट दिली. या वेळेस त्यांच्यासमवेत नगराध्यक्ष सुनील कविस्कर, मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, नगरसेवक ॲड. निखील शिंदे, .Drinking Water Storage: तेरा प्रकल्पांतील साठा पिण्यासाठी आरक्षित.प्रमोद महाडिक, विद्या देसाई, ॲड. सनी जाधव यांच्यासह सिद्धेश पाटेकर, नगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे अभियंता रोहित भोईर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. .Dam Water Storage: राज्यातील धरणांत ३४ टक्के पाणीसाठा.या कामासाठी सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. आपण हा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे सादर करणार आहोत. शक्य झाल्यास दोन महिन्यांमध्येच या कामाला प्रारंभ करण्याचा आपला प्रयत्न असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले..पिण्यास उपयुक्तनडगाव खाण परिसरात उत्खननामुळे तीन तलाव तयार झाले आहेत. या तलावांतील पाणीसाठा महाड शहराला किमान आठ महिने पुरेल इतका प्रचंड आहे. तलावातील पाणी स्वच्छ, शुद्ध आणि प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत पिण्यास उपयुक्त आहे. ही बाब नगरसेवक ॲड. सनी जाधव आणि ॲड. निखिल शिंदे यांनी भरत गोगावले यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर त्यांनी या तलावाला भेट दिली. सध्या या तलावातून दररोज बारा लाख लिटर पाणीपुरवठा होतो..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.