Agriculture
Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Chemical Fertilizers Subsidy : रासायनिक खतांवर अन्नद्रव्याधारित अनुदान

नरेश देशमुख

Nutrient Based Subsidy on Chemical Fertilizers : भारत सरकारच्या १ मार्च २०२४ रोजी प्रपत्र क्रमांक २३०११/२/२०२४ -P & K नुसार रासायनिक खतांवर अन्नद्रव्याधारित अनुदान योजनेअंतर्गत खरीप २०२४ साठी (१ एप्रिल २०२४ पासून ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत) फॉस्फेटिक आणि पोटॅशिक (P&K) खतांसाठी अन्नद्रव्याधारित (NBS) योजनेअंतर्गत अनुदान लागू केलेले आहेत.

खत उत्पादक/आयातदारांमार्फत शेतकऱ्यांना अनुदानित किमतीत युरिया, फॉस्फरस व पोटॅशयुक्त खतांच्या २८ ग्रेडची खते उपलब्ध करून दिलेली आहेत. फॉस्फेटिक आणि पोटॅशिक खतांवरील अनुदान १.४.२०१० पासून रासायनिक खतांवर अन्नद्रव्याधारित अनुदान योजनेद्वारे नियंत्रित केले जाते. शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत खते उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने खत कंपन्यांना मंजूर दरानुसार अनुदान दिले जाते.

भारत सरकारने खरीप २०२४ साठी (१ एप्रिल २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४) रासायनिक खतांवर अन्नद्रव्याधारित अनुदान योजना धोरणांतर्गत फॉस्फेटिक आणि पोटॅशिक खतामध्ये समाविष्ट असलेल्या नायट्रोजन (N), फॉस्फरस (P), पोटॅश (K) आणि सल्फर (S) या अन्नद्रव्यांवर प्रति किलो अनुदान पुढील प्रमाणे मंजूर केले आहे.

२०२४ च्या खरीप हंगामासाठी फॉस्फेटिक खतांवरील अनुदान २०२३ च्या रब्बी हंगामात प्रति किलो २०.८२ रुपये होते ते वाढवून २८.७२ रुपये प्रति किलो करण्यात आले आहे. तथापि, २०२४ खरीप हंगामासाठी नायट्रोजन, पोटॅशिक आणि सल्फरवरील अनुदान अपरिवर्तित ठेवण्यात आले आहे. २०२४ च्या खरीप हंगामासाठी फॉस्फेटिक आणि पोटॅशिक खतांसाठी २४,४२० कोटी रुपयांच्या अनुदानाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

अनुदानामुळे, सध्या १,३५० रुपये प्रति बॅग (५० किलो) विकल्या जाणाऱ्या डीएपीची (डाय-अमोनिअम फॉस्फेट) किंमत आगामी २०२४ खरीप हंगामासाठी अपरिवर्तित राहील. म्युरेट ऑफ पोटॅशची (एमओपी) उपलब्धता १,६७० रुपये प्रति बॅग आणि एनपीकेची किंमत प्रति बॅग १,४७० रुपये राहील.

डीएपीवरील आयात अवलंबित्व कमी करण्यासाठी एनबीएस योजनेअंतर्गत तीन नवीन खत ग्रेड उदा. मॅग्नेशिअम, झिंक, बोरॉन आणि सल्फरसह फोर्टिफाइड एनपीके (११-३०-१४), युरिया-एसएसपी कॉम्प्लेक्स (५-१५-०-१०) आणि मॅग्नेशिअम, झिंक आणि बोरॉनसह फोर्टिफाइड एसएसपी (०-१६-०-११) असलेल्या अन्नद्रव्याधारित अनुदान एनबीएस योजनेत समाविष्ट समाविष्ट करण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमती सुनिश्‍चित करण्यासाठी खत कंपन्यांना मंजूर आणि अधिसूचित दरानुसार अनुदान मिळणार आहे.

अन्नद्रव्य---एनबीएस दर (रुपये प्रति किलो अन्नद्रव्य)

नायट्रोजन (N)---४७.०२

फॉस्फरस (P)---२८.७२

पोटॅश (K)---२.३८

सल्फर (S)---१. ८९

वरील तक्त्यावरून आपण प्रत्येक एनपीके खतावर किती अनुदान मिळेल हे काढू शकतो. उदाहरणार्थ, आपण एका कंपनीच्या २४:२४:० खतावर किती अनुदान मिळेल ते समजाऊन घेऊयात.

२४:२४:० ग्रेड मध्ये २४ टक्के नत्र (N ), २४ टक्के फॉस्फरस (P) आणि ० टक्का पोटॅश (K) आहे. याचाच अर्थ दर १०० किलो खतामध्ये २४ किलो नत्र आणि २४ किलो फॉस्फरस आहे. म्हणजेच ५० किलोच्या एका बॅगमध्ये १२ किलो नत्र आणि १२ किलो फॉस्फरस मिळेल.

एक किलो नत्र अन्नद्रव्याच्या अनुदानाचा दर तक्त्यानुसार ४७.०२ रुपये आहे. १२ किलो नत्रासाठी ४७.०२ × १२ = ५६४.२४ रुपये होतील.

एक किलो फॉस्फरस अन्नद्रव्यांच्या अनुदानाचा दर २८.७२ रुपये आहे. १२ किलो फॉस्फरससाठी २८.७२ × १२ = ३४४.६४ रुपये होतील.

दोन्ही नत्र आणि फॉस्फरसची बेरीज ५६४.२४ + ३४४.६४ = ९०८.८८ होते. म्हणजेच २४:२४:० खताच्या ५० किलोच्या गोणीवर आपणास ९०८.८८ रुपये अनुदान मिळेल. एक टन २४:२४:० खतावर ९०८.८८ × २० गोणी = १८,१७८ रुपये एवढे अनुदान मिळेल.

अशा प्रकारे आपण इतर खतांमधील उपलब्ध अन्नद्रव्यांच्या प्रमाणावरून मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम काढू शकतो. खालील तक्त्यात विविध ग्रेड्सवर मिळणारी अनुदानाची प्रति टन रक्कम दिली आहे.

एफसीओ अंतर्गत एनबीएस योजनेअंतर्गत समाविष्ट फॉस्फेटिक आणि पोटॅशिक खतांच्या विविध ग्रेडवर १.४.२०२४ ते ३०. ९. २०२४ या कालावधीसाठी अनुदान तक्ता

एनबीएस योजनेअंतर्गत फॉस्फेटिक आणि पोटॅशिक खतांचा कोणताही प्रकार एफसीओ अंतर्गत प्रदान केल्यानुसार बोरॉन, झिंक, मॅग्नेशिअम आणि सल्फरसह फोर्टिफाइड आहेत, ती खते अनुदानासाठी पात्र राहतील. मुख्य अन्नद्रव्याव्यतिरिक इतर अन्नद्रव्यांनीयुक्त अशा फोर्टिफाइड खतांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी या खतांना प्रति टन अतिरिक्त अनुदान खालील प्रमाणे मिळणार आहे.

एफसीओ नुसार निर्देशित अन्नद्रव्ये ----अतिरिक्त अनुदान (रु./मे.टन)

बोरॉन (B) ---३००

झिंक (Zn)---५००

ग्रेड अनुदान (रु. प्रति मे. टन) ग्रेड अनुदान (रु. प्रति मे. टन)

डीएपी १८ः४६०ः० २१,६७६ एनपीके १४ः३५ः१४ १६,९६९

एमओपी ०ः०ः६०ः० १,४२७ एमएपी ११ः५२ः०ः० २०,१०८

ए एस पी ०ः१६ः०ः११ ४,८०४ टीएसपी ०ः४६ः०ः० १३,२१३

एनपीएस २०ः२०ः०ः१३ १५,३९५ एन पी के १२ः३२ः१६ १५,२१४

एन पी के १०ः२६ः२६ः० १२,७८८ एन पी के १४ः२८ः१४ १४,९५८

एनपी २०ः२०ः०ः० १५,१४८ एनपीकेएस १५ः१५ः१५ः०९ ११,८८९

एन पी के १५ः१५ः१५ः० ११,७१८ एनपी १४ः२८ः०ः० १४,६२५

एनपी २४ः२४ः०ः० १८,१७८ पीडीएम ०ः०ः१४.५ः० ३४५

एएस २०.५ः०ः०ः२३ १०,०४५ युरिया-एसएसपी संयुक्त खत (५ः१५ः०ः१०) ६,८४९

एनपी २८ः२८ः०ः० २१,२०८ एनपी एस २४ः२४ः०ः८* १८,१७८

एन पी के १७ः१७ः१७ १३,२८१ एनपीके ८ः२१ः२१* १०,२९३

एन पी के १९ः१९ः१९ १४,८४३ एनपीके ९ः२४ः२४* ११,६९६

एन पी के १६ः१६ः१६ः० १२,४९९ एनपीके ११ः३०ः१४* १४,१२२

एनपीएस १६ः२०ः०ः१३ १३,५१४ एसएसपी ०ः१६ः०ः११* ४,८०४

* एफसीओ १९८५ नुसार नोंदणी झालेली फोर्टिफाईड खते.

(लेखक पुणे येथील महाधन ॲग्रीटेक लिमिटेड कंपनीमध्ये चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, क्रॉप न्यूट्रिशन बिझनेस, या पदावर कार्यरत आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pre Monsoon Rain : पूर्वमोसमी पावसामुळे शेकडो संसार उघड्यावर

Turtle Conservation Issue : रायगडमध्ये तापमानवाढीमुळे कासवसंवर्धन संकटात

Forest Fire Himachal : उत्तराखंडसारखीच आगीमुळे हिमाचलची अवस्था, भाजपचा हल्लाबोल, गावकऱ्यांचा इशारा

Summer Heat : उष्णता वाढली पारा ४५ अंश सेल्सिअसवर

Agrowon Podcast : गव्हाच्या भावात सुधारणा ; कापूस, सोयाबीन, हळद, तसेच काय आहेत गहू दर ?

SCROLL FOR NEXT