Sunetra Pawar  Agrowon
ॲग्रो विशेष

Baramati Lok Sabha : आता शिवतारे-अजित पवार यांची दोस्ती पाहा : शिवतारे

Ajit Pawar : बारामती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी माजी मंत्री विजय शिवतारे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

Team Agrowon

Pune News : बारामती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी माजी मंत्री विजय शिवतारे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या वेळी दोघांनी मोकळेपणाने चर्चा केली.

या वेळी शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा ममता लांडे-शिवतारे यांनी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा सत्कार केला.

या वेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दिलीप यादव, पुरंदर तालुकाप्रमुख हरिभाऊ लोळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष उत्तम धुमाळ, वामन जगताप, नीलेश जगताप, विराज काकडे, दिलीप कटके, राजेंद्र झेंडे, ज्योती झेंडे, राहुल गायकवाड, अलका बडदे आदी उपस्थित होते.

या वेळी शिवतारे म्हणाले, ‘या अगोदर अजित पवार व शिवतारे यांची दुष्मनी पाहिली, पण आता आमचे जुळले आहे. त्यामुळे आता शिवतारे व अजित पवार (Ajit Pawar) यांची दोस्ती पाहा. माझ्या उभे राहण्याच्या भूमिकेमुळे जो अपप्रचार झाला आहे.

त्यामुळे लोक संभ्रमावस्थेत होते. माझ्या लोकांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. ११ तारखेची पालखी तळावरील सभा झाल्यावर मी प्रत्येक गावात जाऊन पुन्हा वातावरण निवळण्याचा प्रयत्न करणार आहे. सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार अधिकच्या मताधिक्याने पुरंदर तालुक्यातून निवडणूक येतील यात शंका नाही. ताई तुम्ही काळजी करू नका आपला विजय निश्चित आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT