Devendra Fadnavis on Union Budget 2023 Agrowon
ॲग्रो विशेष

Budget Maharashtra 2023 : आता १ रुपयांत काढता येणार पीकविमा

राज्य सरकार विम्याच्या हप्त्याचा भार उचलणार आहे, अशी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

Team Agrowon

राज्यातील शेतकऱ्यांना पीकविमा १ रुपयामध्ये पीकविमा काढता येणार आहे. आधीच्या योजनेत विमा हप्त्याच्या २ टक्के रक्कम शेतकरी भरत होते.

प्रीमियम भरण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो.

अर्थसंकल्पातील नवीन तरतुदी नुसार शेतकऱ्यांवर विम्याच्या हप्त्याचा भार राहणार नाही.

राज्य सरकार विम्याच्या हप्त्याचा भार उचलणार आहे, अशी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

यासाठी राज्य सरकार ३ हजार ३१२ कोटी रुपयांचा भार उचलणार आहे. त्यामुळे शेतकरी आता १ रुपयांमध्ये पीक विमा काढू शकतात.

राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता.९) राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला.

शिंदे शिवसेना आणि भाजप सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना सरकारकडून अपेक्षा आहेत.

अर्थसंकल्पात शेती आणि शेतकऱ्यांवर विशेष भर देण्यात आला आहे.

शाश्वत शेती आणि समृद्ध शेतकरी टॅगलाइनखाली शेतकऱ्यांसाठी विविध योजनाची घोषणा करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT