Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : सोयाबीन, कपाशी, तूर पिकांच्या २५ टक्के अग्रिमसाठी अधिसूचना

Team Agrowon

Parbhani News : पंतप्रधान पिकविमा योजनेतील मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती (मिड-सिझन अॅडव्हर्सिटी) या जोखीमबाबीअंतर्गत परभणी जिल्ह्यातील सर्व ५२ मंडलांतील यंदाच्या (२०२४) खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी, तूर पीकविमाधारक शेतकऱ्यांना संभाव्य विमा परतावा रकमेच्या २५ टक्के मर्यादेत अग्रिम (आगाउ) रक्कम देण्याचे आदेश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले असून सोमवारी (ता. ३०) त्याबाबतची अधिसूचना काढली आहे.

यामुळे जिल्ह्यातील ७ लाख १२ हजार ८६७ शेतकऱ्यांना सुमारे ३०० कोटी रुपयांवर अग्रिम विमा मिळू शकेल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील उपसंचालक महादेव लोंढे यांनी दिली.

मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती अंतर्गंत पूर, पावसातील खंड, दुष्काळ, कीड व रोगांचा प्रादुर्भाव आदी बाबींमुळे अधिसूचित मंडलांतील पिकांच्या अपेक्षित उत्पादनात गत ७ वर्षांतील सरासरी उत्पादनाच्या तुलनते ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर येणाऱ्या विमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के मर्यादेत शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम देण्याची तरतूद आहे. यंदा परभणी जिल्ह्यात अनेकवेळा अतिवृष्टी झाली.

जास्त पावसामुळे कपाशी, तूर पिकामध्ये मूळकुज झाली. सोयाबीन पिकामध्ये प्रतिकूल वातावरणामुळे कीड, रोगांच्या प्रादुर्भावाने आर्थिक नुकसान पातळी ओलांडली. या पिकांच्या उत्पादनात सरासरी उत्पादनाच्या तुलनेत ५० टक्क्यांहून अधिक घट अपेक्षित आहे.

पर्जन्यमानातील असाधारण तफावत, नैसर्गिक आपत्ती, पूर परिस्थितीमुळे २५ टक्क्यांपेक्षा जास्त बाधित क्षेत्र या प्रातिनिधिक सूचकाआधारे तसेच राज्य शासन व विमा कंपनी प्रतिनिधी यांच्या संयुक्त पाहणीनुसार जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सोयाबीन, कपाशी, तूर या तीन पिकांच्या संभाव्य पीक विमा परतावा रकमेच्या २५ टक्के अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्सुरन्स कं. लि.ला आदेशित केले आहे.

ही अधिसूचना जाहीर झाल्यापासून १ महिन्याच्या आत परंतु राज्य व केंद्र शासनाचा प्रथम विमा हप्ता प्राप्त झाल्यानंतर या तरतुदीनुसार सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांकरिता सर्व विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर २५ टक्के अग्रिम रक्कम जमा करावी असे आदेश दिले आहेत.

मध्य हंगाम प्रतिकूलस्थिती विमाधारक शेतकरी

पीक विमाधारक शेतकरी संख्या

सोयाबीन ४,५०,६३०

कपाशी १,६०,१२०

तूर १,०२,११७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Flower Market : शेवंती, झेंडूचा भाव वधारला

Ativrushti Madat : ऑगस्ट, सप्टेंबरमधील अतिवृष्टीसाठी ७ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना मदत मंजूर;  शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार मदतीची रक्कम

Paddy Crop Damage : परतीच्या पावसामुळे हळवी भातशेती धोक्यात

Tawarja River : तावरजा नदीवरील चार बंधाऱ्यांचे बॅरेजेसमध्ये रूपांतर

Cotton Soybean Subsidy : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी अर्थसाह्यासाठी ई-केवायसी करावी

SCROLL FOR NEXT