Donald Trump Agrowon
ॲग्रो विशेष

Donald Trump: ...तोपर्यंत भारताबरोबर व्यापार कराराबाबत चर्चा नाही : ट्रम्प

US-India Relations: आयात शुल्काच्या वादावर तोडगा निघेपर्यंत भारताबरोबर व्यापार कराराबाबत चर्चा करणार नाही, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. त्यांच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध प्रश्‍नांवर अमेरिकेची भूमिका मांडली.

Team Agrowon

New York News: आयात शुल्काच्या वादावर तोडगा निघेपर्यंत भारताबरोबर व्यापार कराराबाबत चर्चा करणार नाही, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. त्यांच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध प्रश्‍नांवर अमेरिकेची भूमिका मांडली.

अमेरिकेने भारतावर २५ टक्के आयात शुल्क आणि रशियाकडून तेलखरेदी करत असल्याबद्दल आणखी २५ टक्के कर लागू केला आहे. मात्र या देशाबरोबर मागील दोन ते तीन महिन्यांपासून नव्या व्यापार कराराबाबत चर्चा सुरू असून, या चर्चेच्या पाच फेऱ्याही झालेल्या आहेत. अतिरिक्त आयात शुल्क २७ ऑगस्टपासून लागू होणार आहे.

हे शुल्क लागू होण्याच्या आधीच व्यापार कराराच्या चर्चेला वेग येईल का, असा प्रश्‍न ट्रम्प यांना आज विचारण्यात आला. त्या वेळी ट्रम्प यांनी आयातशुल्क वादाचा मुद्दा पूर्णपणे निकालात निघाल्याशिवाय नाही, असे स्पष्ट केले. ट्रम्प यांनी रशियावरही या वेळी टीका केली. ‘‘युक्रेनबरोबर शस्त्रसंधी करण्याचा माझा प्रस्ताव रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी स्वीकारला नाही, हे चुकीचे झाले.

‘‘युक्रेनबरोबर शस्त्रसंधी करण्याचा माझा प्रस्ताव रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी स्वीकारला नाही, हे चुकीचे झाले. भारताला दुखावणे हे रशियाला दुखाविण्यासारखेच आहे. मात्र याचा आम्हालाही त्रास होत आहे. युक्रेनमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी रशियाने मनापासून प्रयत्न करावेत, कोणाचाही कोणाबरोबरही वाद असू नये आणि पुतीन यांच्याबरोबरच जिनपिंग आणि मोदी हेदेखील अमेरिकेचे मित्र राहावेत, अशीच आमची इच्छा आहे,’’ असे ट्रम्प म्हणाले.

व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर?

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर येणार आहेत. मात्र अद्याप त्यांच्या येण्याची तारीख नक्की झालेली नसली तरी वर्षअखेर ते भारताला भेट देऊ शकतात, असे वृत्त रशियन माध्यमांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या हवाल्याने दिले आहे.

एकीकडे अमेरिका आणि रशियात वाद सुरू असतानाच अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के आयात शुल्क लावून मोठा दणका दिला आहे. या दरम्यान आता रशियाशी चर्चा करण्यासाठी भारताचे श्री. डोवाल मॉस्कोत पोहोचले आहेत. तेथे ते रशियन अधिकारी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी चर्चा करणार आहेत.

याआधी रशियाची ‘इंटरफॅक्स न्यूज एजन्सी’ने डोवाल यांच्या हवाल्याने राष्ट्राध्यक्ष पुतिन वर्षअखेर भारताचा दौरा करू शकतात, असे म्हटले आहे. या बातमीला अद्यापही रशियाकडून किंवा भारताकडून अधिकृत दुजोरा दिलेला नाही. कझान येथे ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी पुतीन यांना २०२५ मध्ये भारतात होणाऱ्या भारत-रशिया शिखर परिषदेचे आमंत्रण दिले होते.

मोदी चीन दौऱ्यावर जाणार

नवी दिल्ली ः पंतप्रधान मोदी या महिन्याच्या शेवटी शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) शिखर परिषदेसाठी चीनला जाणार आहेत. ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या काळात तियानजिन येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे देखील उपस्थित राहणार आहेत. मुख्य म्हणजे, पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय बैठक होण्याचीही शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Adulteration: भेसळयुक्त दूध आरोग्यासाठी धोकादायक; घरच्या घरी तपासा दुधातील भेसळ

River Linking Project: दुष्काळमुक्तीकडे वाटचाल, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला ७८ टीएमसी पाणी मिळणार- मुख्यमंत्री फडणवीस

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार, कापूस स्थिर, टोमॅचो आवक सुधारली, डाळिंबाला उठाव, मिरचीला उठाव टिकून

Land Acquisition: ‘शक्तिपीठ’साठी पारदर्शक भूसंपादन हवे

NA Permission Rule: शेतजमिनीवर घर बांधण्यासाठी ‘NA’ परवानगीची अट रद्द ; राज्य सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT