Seed Distribution Schemes: राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान आणि कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत खरीप हंगाम २०२६-२७ साठी जिल्हा कृषी विभागाने पुढाकार घेतला असून, जिल्ह्यातील पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित पीक प्रात्यक्षिके आणि प्रमाणित बियाणे वितरण या घटकांसाठी शेतकरी गटांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत..या अभियानांतर्गत प्रामुख्याने तूर, मूग, उडीद, बाजरी, मका आणि सोयाबीन या पिकांच्या उत्पादकता वाढीवर भर दिला जाणार आहे. शेतकऱ्यांपर्यंत नवीन तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी ही प्रात्यक्षिके आयोजित केली जातील. या साठी ३१ मार्च २०२४ पूर्वी नोंदणी झालेले शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या (एफपीसी) आणि सहकारी संस्था या योजनेसाठी पात्र आहेत. .Crop Demonstration : पीक प्रात्याक्षिक घटकासाठी शेतकरी गटांनी अर्ज करावेत .गटांची निवड ही ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ (एफसीईएस) या तत्त्वावर केली जाणार आहे. शासनाच्या नियमानुसार, अर्जदार आणि लाभार्थी गटातील सर्व सदस्यांकडे ‘फार्मर आयडी’ असणे अनिवार्य आहे. इच्छुक गटांनी महाडीबीटी पोर्टलवर अधिकृत सदस्यामार्फत अर्ज करणे आवश्यक आहे..Rabi Crop Demonstration : तेलबिया उत्पादनाचे रब्बीत १७,८०० हेक्टरवर पीक प्रात्यक्षिके.त्यासाठी संकेतस्थळ: https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ‘‘प्रात्यक्षिक, औषधे आणि खते’’ या टॅबखाली अर्ज सादर करावा. त्याशिवाय वैयक्तिकरित्या शेतकरीही बियाणे घटकासाठी अर्ज करू शकतात, असे सांगण्यात आले..आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन उत्पादन वाढवण्यासाठी जास्तीत जास्त शेतकरी गटांनी या योजनेत सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.- शुक्राचार्य भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.