Mahasanskruti Festival Agrowon
ॲग्रो विशेष

Mahasanskruti Festival : महासंस्कृती महोत्सवाकडे पहिल्या दिवशी ग्राहकांची पाठ

No Response of Festival : लाखो रुपये खर्च करून घेतल्या जात असलेल्या या महोत्सवाकडे पहिल्याच दिवशी शेतकरी, ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले.

Team Agrowon

Nagar News : सांस्कृतिक विभाग, जिल्हा परिषद व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नगर येथे गुरुवार (ता. २२)पासून ‘महासंस्कृती, कृषी व बचत गट महोत्सव सुरुवात झाली. मात्र लाखो रुपये खर्च करून घेतल्या जात असलेल्या या महोत्सवाकडे पहिल्याच दिवशी शेतकरी, ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले.

नियोजनाचा अभाव असल्यामुळे पहिल्या दिवशी दुपारपर्यंत तर बहुतांश स्टॉल मोकळेच होते. त्यामुळे या महोत्सवाला प्रतिसाद मिळतो की नाही याची भीती आयोजकांना वाटत आहे.

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतीमालाची थेट ग्राहकांना विक्री करता यावी. कृषी महोत्सव स्वतंत्र घेण्याऐवजी गेल्या वर्षीपासून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या हट्टापायी एकत्रित महोत्सव घेतला जात आहे. यंदाही शेतकरी,

महिला बचत गटाचे हिताऐवजी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा महोत्सव केला जात आहे. यंदा सांस्कृतिक विभागाची याला जोड दिली आहे. लाखो रुपये महोत्सवावर खर्च झाले असताना जाणीवपूर्वक आयोजकांकडून प्रचार प्रसिद्धीकडे दुर्लक्ष केल्यामुळे शहरासह जिल्ह्यातील कोणत्याच भागात नगरला या वर्षीही महोत्सव आहे,

या बाबत जनजागृती झाली नाही. त्याचे परिणाम पहिल्या दिवशी दिसून आले. चार दिवस अशीच परिस्थिती राहिली तर आणि लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेतलेला महोत्सवाला प्रतिसाद मिळतो की नाही याची भीती आयोजकांना आहे. आयोजन करणारे अधिकारी, कर्मचारी महोत्सवस्थळी दबक्या आवाजात तशी चर्चा करत होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT