Banana Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : बागायतदारांना हवा मदतनिधी शासनाकडून कार्यवाहीच नाही

Heavy Rain Crop Loss : बागायती पीक जमीनदोस्त झाले. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे.

Team Agrowon

Jalgaon News : दुष्काळाने शेतकरी होरपळला गेलेला असतानाच मागील हंगामातील मार्च ते जून या कालावधीत झालेल्या वादळीवाऱ्यासह पावसाने एरंडोल, भडगाव, चाळीसगाव भागात लिंबू, मोसंबी, केळी बागांची मोठी हानी झाली आहे. बागायती पीक जमीनदोस्त झाले. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे.

गिरणा पट्ट्यातील सुमारे 25 गावांत लिंबू, मोसंबी आदींची मोठी हानी मार्च ते जून या कालावधीत झालेल्या नैसर्गिक आपत्तीने झाली आहे. सुमारे 300 हेक्टरवरील पिकांना वादळी पावसाचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

मागील वर्षी खरिपात पावसाने पाठ दाखविल्याने उत्पादनात ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली. रब्बीही आला नाही. कारण गिरणा धरणात पाणी नव्हते. पाऊस नसल्याने विहिरींनी तळ गाठल्याने रब्बी हवा तसा आला नाही. काही शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन करून लागवड केलेले फळपीक वादळाने जमीनदोस्त केल्याने शेतकरी संकटात आला.

एरंडोल तालुक्यात उत्राण येथे तीन-चार वेळेस लिंबू बागांची मोठी हानी झाली. पाहणी दौरे झाले. परंतु कुठेही भरपाई मिळालेली नाही. केळी पिकाचेही या भागात नुकसान झाले आहे. गिरणा पट्टा हा दुष्काळी, आवर्षणप्रवण भाग म्हणून ओळखला जातो. याच भागात नैसर्गिक समस्याही अधिक येत असल्याने शेतकरी हवालदील झाला आहे.

लिंबू पिकास फटका

एरंडोल, पाचोरासह भडगावातील शिवणी, गुढेसह इतरही काही गावांमध्ये वादळी पावसाने लिंबूंना फटका बसला. त्यामुळे लिंबू उत्पादक शेतकऱ्यांचे यावर्षीचे उत्पादन अक्षरशः मातीत गेले आहे. कारण पूर्वीही वादळी पाऊस झाला होता.

हिवाळ्यातही नुकसान झाले होते. कृषी विभागाने या नुकसानीचे पंचनामे केले आहे. काही भागात ‘लिंबूंची झाडे उन्मळून पडली तरच पंचनामे करता येतील’, असे कृषी विभागाने सांगून पंचनामे टाळले होते. परंतु जेथे नुकसान झाले. तेथे भरपाई तातडीने दिली जावी, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Fertiliser Linking : उत्तर प्रदेशच्या धर्तीवर खत लिकिंगसाठी महाराष्ट्रात नवा नियम आणणार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची विधानसभेत माहिती

Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

Blight Disease: बदलत्या वातावरणात करपा रोगाची शक्यता

Raju Chaudhari Success Story: कडा ते कॅनडा

Nilesh Rane: कोकणातील आंबा, काजू बागायतदारांच्या मदत प्रश्नी निलेश राणेंनी कृषीमंत्र्यांना घेरले

SCROLL FOR NEXT