Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना मदतनिधीची प्रतीक्षा

Heavy Rain Crop Loss : खानदेशात २०२१ व २०२२ मध्ये खरिपात अतिवृष्टीमुळे मोठी पिकहानी झाली आहे. पण नुकसान भरपाई किंवा मदतनिधी प्राप्त झालेला नाही.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात २०२१ व २०२२ मध्ये खरिपात अतिवृष्टीमुळे मोठी पिकहानी झाली आहे. पण नुकसान भरपाई किंवा मदतनिधी प्राप्त झालेला नाही. काही भागात हा निधी प्राप्त झाला आहे, पण तो अतिशय तोकडा असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

२०२२ मध्ये हानी झाली. पण त्यात नुकसानग्रस्त भागाचा मोठा समावेश पंचनामे व्यवस्थित न झाल्याने करण्यात आला नाही. जळगाव जिल्ह्यात सुमारे दीड लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. धुळ्यात सुमारे ८० हजार व नंदुरबारातही ७० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. पण नुकसानीबाबतची चर्चा लोकप्रतिनिधी सध्या करीत नसल्याचे चित्र आहे.

जळगाव तालुक्यात म्हसावद व परिसरात मदतनिधीचे वितरण काही शेतकऱ्यांना मागील वर्षी झाले आहे. पण फक्त १००, ४००, ४०० ० रुपये एवढा मदतनिधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्राप्त झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. अतिवृष्टीमुळे कापूस पिकाची मोठी हानी झाली. त्यापूर्वी पावसाने ताण दिल्याने उडीद, मुगाचे नुकसान झाले. सोयाबीनचेदेखील ६० टक्क्यांवर नुकसान झाले.

फक्त ज्वारी, मक्याचे काहीसे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती आले. कापूस पिकात अतिवृष्टीनंतर नोव्हेंबरच्या मध्यात गुलाबी बोंड अळीने नुकसान केले. पिकांची अतोनात हानी झाली आहे. पण भरपाई प्राप्त झालेली नाही. शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम कसाबसा उभा केला आहे. पंचनामे, सरसकट भरपाई, कोकणच्या धर्तीवर मदत अशी आश्वासने अनेकदा लोकप्रतिनिधी व इतरांनी दिली.

परंतु भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. दुसरीकडे पपई, केळी उत्पादकांनादेखील फटका बसत आहे. काढणी रखडली आहे. दर परवडत नाही. कापसाची खेडा खरेदी ठप्प आहे. दुहेरी संकटांचा सामना शेतकरी करीत असल्याने मदतनिधीची आवश्यकता आहे. पण प्रशासन, शासन लक्ष देत नसल्याचा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT