Minister Sandipan Bhumre Agrowon
ॲग्रो विशेष

Minister Sandipan Bhumre : नुकसानग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल तत्काळ शासनास सादर करावा. एकही शेतकरी नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहणार नसल्याची ग्वाही पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी दिली.

कन्नड तालुक्यातील जेऊर, निपाणी, औराळा, आणि फुलंब्री तालुक्यातील कान्हेगाव व बाबरा या गारपिटीमुळे बाधित झालेल्या पिकांची पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी पाहणी केली.

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. त्यावेळी श्री. भुमरे बोलत होते.

जेऊर येथील शेतकरी अशोक पवार, निपाणी येथील दत्तात्रय निकम यांच्या शेतातील कांदा पीक, संजय पवार यांच्या बाजरी पिकाच्या तसेच शिवारातील इतर शेतकऱ्यांच्या शेताला भेट देत नुकसानाची पालकमंत्र्यांनी पाहणी करून त्यांना धीर दिला.

पीकानुसार झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळेल. ज्वारी, बाजरी, कांदा, आणि इतर फळपिकांचा समावेश मदतीमध्ये होणार आहे. कोणीही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असा विश्वास पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांनी संवाद साधताना दिला.

नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर पालकमंत्र्यांनी निपाणी ते औराळा दरम्यानच्या रस्त्यांची देखील पाहणी केली.

यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, कृषी उपसंचालक प्रकाश देशमुख, तहसीलदार श्री. वरकड यांच्यासह महसूल आणि कृषी विभागाचे संबंधित अधिकारी या दौऱ्यामध्ये उपस्थित होते.

कन्नड तालुक्यातील निपाणी आणि जेऊर या दोन गावातील शेतीच्या पंचनाम्यासाठी दहा तलाठ्यांची नियुक्ती केली असून लवकरात लवकर शेतीचे पंचनामे पूर्ण होतील, असे यावेळी उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते यांनी सांगितले.

पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी फुलंब्री तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी आमदार हरिभाऊ बागडे उपस्थित होते.

यावेळी उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे आणि तहसीलदार शीतल राजपूत यांनी तालुक्यातील नुकसान झालेल्या शेतपिकाची माहिती तसेच करण्यात येत असलेल्या पंचनाम्यांबाबत पालकमंत्री भुमरे यांना माहिती दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT