Crop Insurance Compensation Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : मका, ज्वारी, सूर्यफूल पिकांना नाही विमा संरक्षण

Crop Insurance Scheme : गारपीट, वादळ, अतिपाऊस आदी समस्या येतात. यामुळे शासनाची पीकविमा योजना पूरक ठरते किंवा या योजनेचा आधार मिळतो.

Team Agrowon

Jalgaon News : तोंडापूरसह परिसरात शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा पिकास रब्बी हंगामातील पीकविमा योजनेतून विमा संरक्षण मिळाले. परंतु मका, सूर्यफूल, ज्वारी या पिकांना संरक्षण नसल्याने अनेक शेतकरी या पिकांसंबंधीच्या पीकविमा परताव्यापासून वंचित राहतील, असे दिसत आहे.

परिसरात रब्बी हंगामात मका, ज्वारी, सूर्यफूल या पिकांची पेरणी वाढली आहे. हरभरा पिकापेक्षा सूर्यफूल, मका पिकावर अनेकांचा भर आहे. शेकडो एकर शेतशिवारात मका, सूर्यफूल, ज्वारी ही पिके असतात. तृणधान्याबाबत जनजागृती झाल्याने ज्वारीचे दर बऱ्यापैकी मिळत आहेत. मागील वर्षी संकरित व दादर ज्वारीला ३८०० ते ४५०० रुपये प्रतिक्विटलचा दर होता. यामुळे ज्वारीची पेरणीदेखील वाढली आहे.

यात रब्बी हंगामात नैसर्गिक समस्याही असतात. गारपीट, वादळ, अतिपाऊस आदी समस्या येतात. यामुळे शासनाची पीकविमा योजना पूरक ठरते किंवा या योजनेचा आधार मिळतो. परंतु परिसरातील तोंडापूर व इतर महसूल मंडलांमध्ये ज्वारी, मका, सूर्यफूल या पिकांचा समावेश रब्बीमधील पीकविमा योजनेसाठी झालेला नाही.

पीकविमा योजनेचे अर्ज पोर्टलवर भरताना त्यात तोंडापूर मंडल नमूद केल्यानंतर फक्त हरभरा व गहू या पिकांचाच पर्याय येत होता. यामुळे फक्त हरभरा, गहू उत्पादक या योजनेत सहभागी झाले. मका, सूर्यफूल उत्पादक मात्र योजनेत सहभागी होऊ शकले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये योजनेबाबत नाराजी आहे.

कृषी विभागाकडे पेरणीची आकडेवारी असते. त्यात अपवादात्मक पिकांना पीकविमा योजनेतून वगळल्यास शेतकऱ्यांत तक्रार नसते. परंतु ज्या पिकाची पेरणी अधिक असते, त्या पिकावर परिसरात अर्थकारण अवलंबून असते, तेच पीक पीकविमा योजनेत विमा संरक्षणासाठी पात्र नसल्याने तक्रारी वाढल्या आहेत. ही चूक कृषी व महसूल यंत्रणांची आहे. पीकविमा तक्रार निवारण समितीने यासंबंधी दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी केली जात आहे.

पीकविमा योजनेत सहभागाची मुदत संपली आहे. परंतु परिसरातील शेतकऱ्यांसाठी मका, सूर्यफूल व ज्वारी पिकासंबंधी ऑफलाइन पद्धतीने विमा योजना राबविली जावी. कृषी विभागाने अर्ज स्वीकारून ते विमा कंपनीला द्यावेत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT