Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

Crop Insurance : शेताचा परस्पर पीकविमा काढल्याची शेतकऱ्याची तक्रार : अकोट तालुक्यातील प्रकार

Crop Insurance Scam : उमरा (ता. अकोट) येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील पिकांचा परस्पर पीकविमा काढण्यात आल्याचा प्रकार घडला असून याबाबत शेतकऱ्याने कृषी, महसूल विभागासह विमा कंपनीकडे तक्रार करीत संबंधिताविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे.
Published on

ॲग्रोवन वृत्तसेवा
Pik Vima 2023 : अकोला ः उमरा (ता. अकोट) येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील पिकांचा परस्पर पीकविमा काढण्यात आल्याचा प्रकार घडला असून याबाबत शेतकऱ्याने कृषी, महसूल विभागासह विमा कंपनीकडे तक्रार करीत संबंधिताविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे.

याबाबत उमरा येथील संदीप पुंडलीकराव येऊल या शेतकऱ्याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की त्यांचे शेत मौजे आलमपूर शिवारात असून उमरा मंडलात मोडते. दोन हेक्टर ४८ आर शेती आहे. त्यामध्ये त्यांनी संत्रा लागवड केली असून या वर्षी संत्रा पिकाची ई-पीक पाहणी केली आहे. ई-पीक पाहणीत संत्रा फळपीक दाखवले आहे.

या पिकाचा किंवा खरीप हंगामाचा विमा काढलेला नाही. आता आंबिया बहराचा पीकविमा काढायचा होता. ५ डिसेंबर रोजी संत्रा पिकाची विमा काढण्याची शेवटची तारीख होती. त्यामुळे सेतू केंद्रावर गेल्यावर त्यांना कळाले की अज्ञात व्यक्तीने १६ नोव्हेंबरलाच या शेतात गहू पिकाचा विमा काढला आहे.

Crop Insurance
Crop Insurance Company : पीकविमा कंपनीविरुद्ध ‘कृषी’ची फौजदारी तक्रार

शेतात संत्रा पीक असतानाही गहू पिकावर विमा काढण्यात आला आहे. याबाबत कुठलीही संमती घेतलेली नाही. संपूर्ण शेत संरक्षित केले आहे. यामुळे येऊल यांना आता संत्रा पिकाचा विमा काढता आलेला नाही. ते आंबिया बहराच्या पीकविमा संरक्षणापासून वंचित राहत आहेत.

या प्रकरणाची चौकशी करून झालेल्या नुकसानाची भरपाई मिळून द्यावी. तसेच अज्ञात व्यक्ती किंवा विमा काढणाऱ्या सुविधा केंद्र चालकाविरुद्ध कारवाई करून न्याय द्यावा अशी मागणी संदीप येऊल यांनी केली आहे. याबाबत तहसीलदार, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकाऱ्यांना त्यांनी निवेदन दिले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com