Fodder Shortage  Agrowon
ॲग्रो विशेष

Fodder Shortage : चारा-पाण्याचा प्रश्न खानदेशात नाहीच

Water Scarcity : यंदा ओल्या दुष्काळामुळे खरिपातील पिकांची स्थिती बिकट बनली. परंतु अनेक प्रकल्पांत जलसाठा मुबलक आहे. तसेच रब्बीतून चारा उपलब्ध होत असून, चाराही मुबलक आहे.

Team Agrowon

Dhule News : यंदा ओल्या दुष्काळामुळे खरिपातील पिकांची स्थिती बिकट बनली. परंतु अनेक प्रकल्पांत जलसाठा मुबलक आहे. तसेच रब्बीतून चारा उपलब्ध होत असून, चाराही मुबलक आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना यंदा दिलासा मिळणार आहे.

पावसामुळे मका, बाजरी व इतर पिके खराब झाली. खरिपात चारा हाती आला नाही. मागील वेळेस दुष्काळामुळे शिवारात पिके करपल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती पुरेसा चाराही लागला नाही, यामुळे महाग चारा घ्यावा लागला होता. तसेच टंचाईदेखील होती.

परंतु यंदा अतिपावसात चारा हातचा गेला. पण पावसामुळे प्रकल्प १०० टक्के भरले. रब्बीची पेरणीही खानदेशात ११० टक्के झाली. रब्बी पिकांची कापणी, काढणी, मळणी सुरू असून, चाराही उपलब्ध होत आहे.

खानदेशात मागील पावसाळ्यात कमी पाऊस होता. वार्षिक सरासरीच्या ८१ टक्के इतका पाऊस झाला. मध्यम व लघू प्रकल्पांमध्ये सरासरी कमी जलसाठा उन्हाळ्यात होता. पाण्यासाठी अनेक विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. धुळ्यातील शिंदखेडा, धुळे, साक्री, जळगावातील चाळीसगाव, अमळनेर, बोदवड आदी भागांत स्थिती गंभीर होती.

धुळे, साक्री, शिरपूर या तीन तालुक्यांतील एकूण २८ महसूल मंडळांत दुष्काळसदृश परिस्थिती होती. पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाला सतत बैठका व नियोजन करावे लागले होते. परंतु यंदा किंवा २०२४ मध्ये पाऊसमान चांगले राहिल्याने आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण सरासरीच्या १३२ टक्के पाऊस झाला आहे. धुळ्यातही पाऊसमान १२० टक्क्यांवर होता. नंदुरबारमध्येही पावसाने सरासरी ओलांडली होती.

चारा दर कमी

सध्या चारा पुरेसा आहे. तसेच पाण्याची समस्याही दूर झाली आहे. दिवसभरात गायीला सरासरी ४० किलो चारा लागतो. तसेच म्हशीला सरासरी ५० किलो चारा लागतो. चारा दर आवाक्यात आहेत. त्यावरील खर्च कमी झाला आहे. अनेक शेतकरी मुरघास बॅगमध्ये हिरव्या चाऱ्याचे तुकडे करून साठवित आहेत. एक, तीन व पाच टनांची एक बॅग चारा साठवणुकीसाठी वापरली जात आहे.

ग्रामीण भागात सद्यःस्थितीला जनावरांना चाऱ्यासह पाणीही मुबलक आहे. मागील वेळेस पावसाळ्यानंतर लागलीच भीषण टंचाई जाणवली होती. पण यंदा चारा सर्वत्र उपलब्ध असून, स्थानिक भागासह अन्य जिल्ह्यातही तो मुबलक असल्याने तो सहज खरेदी करून आणणे शक्य आहे. पाणीही मुबलक आहे. टँकरद्वारे पाणी आणण्याची वेळ यंदा फारशी येणार नाही. मागील वेळेस उन्हाळ्यात पाच हजार लिटरच्या टँकरसाठी पंधराशे रुपये खर्च करावे लागत होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Whatsapp Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?

SCROLL FOR NEXT