Donald Trump Agrowon
ॲग्रो विशेष

Qatar Government: ट्रम्प यांना विमान देण्याबाबत अंतिम निर्णय नाही : कतार

Luxury Plane Gift: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कतारकडून आलिशान विमान भेट देण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नाही, असे कतार सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विमान भेट देण्यावर दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्रालयांमध्ये चर्चाही सुरू आहे.

Team Agrowon

Washington News: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पश्‍चिम आशियाच्या दौऱ्यादरम्यान कतारच्या सत्ताधारी घराण्याकडून ट्रम्प यांना आलिशान विमान भेट देण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्याची माहिती कतारच्या सरकारकडून दिली आहे.

ट्रम्प हे या आठवड्यात मध्य आशियाच्या दौऱ्यावर जाणार असून, यावेळी कतार भेटीदरम्यान ट्रम्प यांना सत्ताधारी घराण्याकडून आलिशान बोइंग ७४७-८ जेट भेट देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांसाठी असलेल्या एअर फोर्सच्या एअर फोर्स वन या विमानात कतारकडून देण्यात येणाऱ्या विमानाचे रूपांतर केले जाईल आणि ट्रम्प २०२९मध्ये त्यांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत हे विमान वापरतील.

त्यानंतर ते अमेरिकी अध्यक्षांच्या साहित्याचा संग्रह असणाऱ्या संकल्पित संग्रहालयात ठेवण्यात येईल. ट्रम्प जेव्हा कतारला येतील तेव्हा त्यांना हे विमान भेट देण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात येईल, असा दावा काही माध्यमांनी केला होता. ट्रम्प हे या दौऱ्यादरम्यान सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावरही जाणार आहेत.

विमान भेट देण्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर कतार सरकारने मात्र या वृत्ताचा इन्कार केला. दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्रालयांदरम्यान याबाबत बोलणी सुरू असून, हे विमान ट्रम्प यांना तात्पुरते देण्यात येणार आहे की, कायमस्वरूपी याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. असे कतार सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. काही तज्ज्ञांच्या मते, अमेरिकी घटनेनुसार अमेरिकी काँग्रेसच्या संमतीशिवाय अशा पद्धतीने भेट स्वीकारता येत नाही. ट्रम्प हे घटनात्मक चौकटीचे उल्लंघन स्वतःच्या फायद्यासाठी करत आहेत, असा आरोपही अनेक जणांकडून करण्यात येत आहे.

बोइंगकडून उशीर

अमेरिकेच्या अध्यक्षांसाठी बोइंग कंपनीकडून तयार करण्यात येते. सध्या अमेरिकेच्या अध्यक्षांसाठी वापरण्यात येत असलेले एअर फोर्स वन हे विमान ३० वर्षे जुने झाले असून, याच श्रेणीतील अत्याधुनिक विमान बनविण्याचे कंत्राट बोइंग कंपनीला देण्यात आले आहे. मात्र, प्रकल्पात झालेल्या नुकसानीमुळे नवे विमान तयार करून देण्यात उशीर होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT