Silk Cocoon Market Agrowon
ॲग्रो विशेष

Silk Market : सोलापूर लातूरसह राज्यात नऊ रेशीम बाजार

Sericulture : राज्यात रेशीम शेतीचा विस्तार होत असताना उत्पादित कोषाला बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न रेशीम संचलनालयाच्या माध्यमातून होत आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : राज्यात रेशीम शेतीचा विस्तार होत असताना उत्पादित कोषाला बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न रेशीम संचलनालयाच्या माध्यमातून होत आहे. त्याच प्रयत्नांतर्गत राज्यात आतापर्यंत सहा ठिकाणी स्वतंत्र रेशीम बाजारपेठांची उभारणी करण्यात आली आहे. याच शृंखलेत सातवी बाजारपेठ सोलापूर येथे सुरू होणार आहे. बुधवारी (ता.१३) वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या बाजारपेठेचे उद्‍घाटन होईल.

रेशीम संचलनालयाच्या माध्यमातून रेशीम शेतीच्या (Silk Farming) विस्तारावर भर दिला जात आहे. त्यासह उत्पादित कोषाची विक्री सहजगत्या करणे शक्‍य व्हावे, याकरिता शेतकऱ्यांना बाजारपेठेचा पर्यायदेखील दिला जात आहे. राज्यात आतापर्यंत जालना, पूर्णा (परभणी), बीड, जयसिंगपूर (कोल्हापूर), अमरावती, पाचोड (छत्रपती संभाजी नगर) अशा सहा ठिकाणी रेशीम बाजार सुरू करण्यात आले आहेत.

यातील पाचोड आणि जालना बाजार हे जवळ जवळ असल्याने यातील पाचोड बाजारात आवक कमी होत गेली. त्यामुळे व्यापारी देखील फिरकेनासे झाले; परिणामी हा बाजार बंद पडला. आता केवळ जालना रेशीम बाजारात व्यवहार होत आहेत. नव्याने लातूर, येवला तसेच बारामती (Baramati) येथे देखील रेशीम बाजार सुरू होणार असल्याचे रेशीम संचालनालयाच्या सूत्रांनी सांगितले.

सोलापुरात बुधवारी उद्‍घाटन

राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून १८ लाख रुपयांची तरतूद सोलापूरातील रेशीम बाजाराच्या इमारतीसाठी करण्यात आली होती. या निधीतून इमारतीचे बांधकाम आता पूर्णत्वास गेले आहे. उर्वरित आवश्‍यक संसाधनासाठी राज्य सरकारकडून निधी दिला जाणार आहे.

त्यामुळे या रेशीम बाजाराचे (Reshim Market) औपचारिक उद्‍घाटन बुधवारी (ता. १३) वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होईल. शनिवारी (ता. ९) रेशीम उपसंचालक महेंद्र ढवळे यांनी त्यांची भेट घेतली.

लातूरला परवानगी मिळाली त्यासह येवला, बारामती येथील रेशीम बाजार इमारतींसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. परिणामी, लवकरच या ठिकाणी रेशीम बाजार भरतील. राज्यातील रेशीम बाजारांना चांगला प्रतिसाद मिळत असून, आवकही चांगली आहे.
- महेंद्र ढवळे, उपसंचालक, रेशीम संचालनालय, नागपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT