Water Storage Agrowon
ॲग्रो विशेष

Water Projects : चाळीसगावातील नऊ प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’

Team Agrowon

Jalgaon News : यंदा झालेल्या दमदार पावसामुळे तालुक्यातील चौदा लघुप्रकल्पांपैकी नऊ प्रकल्पांमध्ये १०० टक्के जलसाठा झालेला आहे. दोन प्रकल्प शंभरीजवळ पोहोचले. दोन प्रकल्पांमध्ये शून्य टक्के साठा आहे.

एका प्रकल्पात २० टक्के जलसाठा आहे. मन्याड धरणात ७५ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होते. या साठ्यामुळे दोन हजार ३०० हेक्टरला फायदा होईल. त्यामुळे खरिपासह रब्बी हंगाम घेता येणार असल्याने शेतकऱ्यांच्या अशा पल्लवित झालेल्या आहेत.

चाळीसगाव तालुक्यात आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाला आहे. दमदार पावसामुळे चौदापैकी खडकीसीम, वाघले १, वाघले २, कुंझर २, वलठाण, हातगाव १, राजदेहरे, कृष्णापुरी, ब्राम्हणशेवगे हे नऊ प्रकल्प ''ओव्हरफ्लो'' झालेले आहेत.

या प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या गावांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, पिंप्री उंबरहोळ, देवळी-भोरस या दोन प्रकल्पांमध्ये शुन्य टक्के पाणीसाठा आहे. सुमारे २२ खेड्यांसाठी संजीवनी ठरलेल्या मन्याड धरणात मागील वर्षी पाणी साचलेच नव्हते. यंदा मात्र, या धरणात ७५ टक्क्यांपेक्षा जास्त जलसाठा जमा झाल्याचे दिसून येत आहे.

गळती थांबविण्याची गरज

चाळीसगाव तालुक्यातील काही प्रकल्पांतून पाण्याची गळती सुरूच आहे. वरखेडे गावापासून दोन किलोमीटरवर असलेल्या कृष्णापुरी धरणाचेदेखील तेच रडग्रहाणे आहे. या प्रकल्पातून पाण्याची चोरीचीदेखील समस्या कायम आहे.

या धरणात आता शंभर टक्के पाणीसाठा झालेल्या प्रकल्पांमधील पाण्याची चोरी रोखण्यासाठी प्रशासनाला मोठे आव्हान राहणार आहे. हिवाळ्यात व उन्हाळ्यात होत असलेल्या पाणी चोरीवर नियंत्रण आणून या प्रकल्पांमधून होणारी पाण्याची गळती थांबवावी, आशी मागणी केली जात आहे.

दोन हजार ३०० हेक्टरला फायदा!

चाळीसगाव तालुक्यातील पेरणीयुक्त ९१ हजार हेक्टर क्षेत्र आहे. या प्रकल्पांमुळे दोन हजार ३०० हेक्टर शेतजमीनीला फायदा होणार आहे. या पाण्यावर गहू, हरभरा, कांद्यासह इतर पिके शेतकऱ्यांना घेता येणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nuksan Bharpai : अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिलासा; राज्य सरकारने दिली २३७ कोटींच्या मदत निधीला मंजुरी

Sugar Factory : ‘वसाका’ वार्षिक भाडेकराराने चालवणार

Revenue Department : दीडशे गावांची जबाबदारी अवघ्या १२ तलाठ्यांवर

Water Scarcity : टॅंकरला विश्रांती, पण टंचाईचे ढग कायम

Agrowon Podcast : टोमॅटोच्या भावात काहिशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत सध्याचे टोमॅटो दर ?

SCROLL FOR NEXT