Workmaster 105 Tractor  Agrowon
ॲग्रो विशेष

New Holland Tractor : ‘न्यू हॉलंड’ चा ‘वर्कमास्टर १०५’ ट्रॅक्टर बाजारात

Agriculture Tractor : सीएनएच इंडस्ट्रिअल (इं) लि. या उपकरणे आणि सेवा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कंपनीच्या ब्रँड ‘न्यू हॉलंड’ ने आज देशातील पहिला १०० + एचपी श्रेणीतील ‘वर्कमास्टर १०५’ ट्रॅक्टर बाजारात सादर केला.

Team Agrowon

Noida News : सीएनएच इंडस्ट्रिअल (इं) लि. या उपकरणे आणि सेवा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कंपनीच्या ब्रँड ‘न्यू हॉलंड’ ने आज देशातील पहिला १०० + एचपी श्रेणीतील ‘वर्कमास्टर १०५’ ट्रॅक्टर बाजारात सादर केला. हा ट्रॅक्टर भारतात तयार करण्यात आला असून, त्याद्वारे भारतीय ट्रॅक्टर उद्योगामध्ये कंपनीने मैलाचा गाठला आहे.

हा ट्रॅक्टर भारतात सादर करण्यानिमित्त ग्रेटर नोएडा (उत्तर प्रदेश) येथे आयोजित कार्यक्रमामध्ये सीएनएच, इंडिया आणि सार्क देशांचे व्यवस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक नरिंदर मित्तल म्हणाले, की अमेरिकेमध्ये १५ हजारापेक्षा जास्त विक्रीतून आपली क्षमता सिद्ध केलेला ‘वर्कमास्टर १०५’ हा उच्च हॉर्सपॉवर श्रेणीतील ट्रॅक्टर भारतामध्ये प्रथमच सादर केला आहे.

जगभरामध्ये न्यू हॉलंड हा ब्रॅण्ड उच्च अश्वशक्ती ट्रॅक्टरसाठी प्रसिद्ध आहे. पण भारतीय शेतकऱ्यांसाठी हे १०० एचपी पेक्षा अधिक क्षमतेचा ट्रॅक्टर प्रथमच सादर करत असल्याचा अभिमान वाटतो.

हे ट्रॅक्टर मोठ्या शेतकऱ्यांना मशागतीसह विविध कामांसाठी उपयोगी ठरतील. हे ट्रॅक्टर विशेषतः उच्च क्षमतेची यंत्रे, अवजारे (उदा. बेलर, हार्वेस्टर, चारा कापणी यंत्रे इ.) चालविण्यासाठी महत्त्वाचे आहेत. या ट्रॅक्टरची किंमत २९.५ लाख रु. (एक्स-शोरूम ) असून, भारतातील न्यू हॉलंड विशेष वितरकांकडे उपलब्ध होतील.

वर्कमास्टर १०५ ची वैशिष्ट्ये

प्रगत एफपीटी इंजिन १०६ एचपी, ३५०० किलो लिफ्ट क्षमता.

इलेक्ट्रो-हायड्रॉलिक ४WD एंगेजमेंट,

चालकासाठी आरामदायक ॲडजस्टेबल बॅकरेस्ट, एअर-सस्पेंडेड सीट, ‘स्टिअरिंग टिल्टींगसह उष्णतेपासून बचावासाठी ‘हीट गार्ड’.

सोप्या हाताळणीसाठी वेगवेगळी कंट्रोल पॅनेल्स.

ॲटोमॅटिक सॉफ्ट पीटीओ स्टार्ट, ॲटो क्लिनिंग सुविधेसह ड्राय फिल्टर, मल्टीडिस्क वेट मेन आणि पीटीओ क्लच, हायड्रॉलिकसाठी न्युमॅटिक शॉक ॲब्सॉर्बर, हेव्ही ड्यूटी फ्रंट ॲक्सल अशा उच्च तंत्रज्ञान सुविधांमुळे ट्रॅक्टरला काम करताना स्थिरता आणि विश्वासार्हता मिळते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT