Organic Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Organic Farming : सेंद्रिय शेती करताना अर्थकारण समजून घेण्याची गरज ः क्षीरसागर

शेतीमाल निर्यात होण्यापूर्वी सर्व निकष पाळून तपासण्या केल्या जातात. त्यामुळे द्राक्षसंबंधी गैरप्रचार योग्य नाहीत, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

Team Agrowon

Nashik News : रासायनिक खते (Chemical fertilizers) व औषधांच्या अतिवापरामुळे शेतीची हानी होत आहे. या पार्श्‍वभूमीवर विषमुक्त, सेंद्रिय शेती (Organic Farming) पद्धतीने काही शेतकरी कामकाज करत आहेत.

कृषी तंत्रज्ञानामुळे होणारे बदल आत्मसात करायलाच हवेत; मात्र शेतीमाल उत्पादनाची मागणी, पुरवठा समजून पीकपद्धती निवडण्याची गरज निर्माण झाली आहे.

मात्र सेंद्रिय शेती करताना त्यातील अर्थकारण समजून घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन नाशिक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व मराठा विद्या प्रसारक (मविप्र) समाज संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले.

केद्राई कृषी व ग्रामविकास संस्था (कार्ड्स) यांच्या वतीने कृषीक्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना नाशिक येथे ‘केद्राईभूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्या वेळी क्षीरसागर बोलत होते.

या वेळी संस्थेचे अध्यक्ष वसंत शिंदे, रोमिफ संस्थेचे ओम देशमुख, निफाड सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भागवत बाबा बोरस्ते, संजीवनी शेतकरी गटाचे अध्यक्ष सुनील भुसे आदी उपस्थित होते.

क्षीरसागर म्हणाले, की दोन पैसे मिळतील म्हणून शेतकरी काम करतो. मात्र रासायनिक पद्धतीने शेती करताना खतांच्या अतिवापरामुळे त्याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च मर्यादित ठेवण्यासह शिफारशीनुसार कामकाज होणे गरजेचे आहे.

त्यानुसार उत्पादनाच्या गुणवत्तेनुसार ग्राहकांनीसुद्धा दोन पैसे देण्याची गरज आहे. अलीकडे द्राक्ष पिकासंबंधी जो गैरप्रचार होत आहे, तो पूर्णपणे चुकीचा आहे. शेतकरी रेसिड्यू फ्री उत्पादनाच्या अनुषंगाने कामकाज करण्यासाठी नियोजन करतात.

शेतीमाल निर्यात होण्यापूर्वी सर्व निकष पाळून तपासण्या केल्या जातात. त्यामुळे द्राक्षसंबंधी गैरप्रचार योग्य नाहीत, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. शासकीय यंत्रणा पुरी पडणारी नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारी चळवळ उभी राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्तविक वसंतराव शिंदे यांनी तर सूत्रसंचालन शिवव्याख्याते प्रविण वाटोडे यांनी केले. आभार शरद सायंकर यांनी मानले. कृषी क्षेत्रातील १४ व्यक्तींना या वेळी सन्मानित करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Election Commission: 'तृणमूल काँग्रेस'चं नाव, चिन्ह गोठवलं; ममतांच्या पक्षाला ‘फुटबॉलपटू’ चिन्ह; निवडणूक आयोगाचा निर्णय

Ahilyanagar District Bank : अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी ३,८३६ मतदार

Farmers Protest : पीक पंचनामा मुद्द्यावर सटाण्यात तहसीलदारांना घेराव

Mohapada Encroachment : मोहपाडा अतिक्रमणप्रश्नी उपग्रह प्रतिमांचा आधार

Dried Sugarcane Crops : करपलेल्या उसात जनावरे सोडण्याची वेळ

SCROLL FOR NEXT