Dairy Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Dairy Farming : फायदेशीर दुग्ध व्यवसाय मॉडेलची विदर्भात गरज

Dairy Business Model : शेतीपूरक दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन दिल्यास त्यामाध्यमातून शेतकऱ्यांचे आणि पर्यायाने विदर्भाचेही अर्थकारण समृद्ध होईल.

Team Agrowon

Nagpur News : शेतीपूरक दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन दिल्यास त्यामाध्यमातून शेतकऱ्यांचे आणि पर्यायाने विदर्भाचेही अर्थकारण समृद्ध होईल. त्याकरिता फायदेशीर दुग्ध व्यवसायाचे मॉडेल अनुभवता यावे याकरिता पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाने पुढाकार घेण्याची गरज आहे, असे मत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी व्यक्‍त केले.

कृषी विद्यापीठाअंतर्गत नागपूरस्थित पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाच्या परिसरातील अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या उद्‍घाटनप्रसंगी कुलगुरू डॉ. गडाख बोलत होते. या प्रकल्पांमध्ये मुक्‍त संचार गोठा, दुग्ध प्रक्रिया केंद्र, विस्तारित अझोला उत्पादन, हायड्रोफोनिक्‍स चारा उत्पादन अशा प्रकल्पांचा समावेश आहे.

कुलगुरू डॉ. गडाख म्हणाले, ‘‘शेतीचे अर्थकारण बदलण्यासाठी पारंपरिक पिकांच्या जोडीला शेतीपूरक व्यवसायावरही लक्ष्य केंद्रित करावे लागणार आहे. त्यामध्ये दुग्धोत्पादन हा पर्याय सक्षम ठरतो. परंतु दुग्धोत्पादनाचे फायदेशीर मॉडेल असल्यास त्याचा अवलंब शेतकरी करतील. पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाकडून त्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत,’’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली.

या वेळी दुग्धशास्त्र विभागत हायड्रोफोनिक चारा उत्पादन क्षमता साडेतीन क्‍विंटलवरून सात क्‍विंटल करण्यात आली. अझोलामुळे दुग्ध उत्पादनात वाढ होऊन पशुखाद्यातही १५ ते २० टक्‍के बचतीचा उद्देश साधता येणार आहे. त्याबरोबरच जनावरांचे आरोग्यही राखता येणार आहे. अशा विस्तारित अझोला उत्पादन प्रकल्पाची उभारणी येथे करण्यात आली आहे.

प्रक्रिया केंद्रात विद्यार्थ्यांसाठी शिका आणि कमवा योजना राबविण्यात येणार आहे. त्याद्वारे दुग्धजन्य प्रक्रिया केलेल्या पदार्थांच्या विक्री नफ्यातून ५० टक्‍के रक्‍कम विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. उद्योजक विद्यार्थी घडावेत, असा हेतू त्यामागे आहे, अशी माहिती पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे प्रमुख व सहयोगी अधिष्ठाता डॉ. विलास अतकरे यांनी दिली. या संपूर्ण विस्तारित प्रकल्पांचे उद्‍घाटन कुलगुरूंच्या हस्ते करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT