Dr. P.G. Patil  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Income : शेतीतील उत्पन्न वाढीसाठी नवीन तंत्रज्ञानाची गरज : कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील

Dr. P.G. Patil : सिंचनाखालील क्षेत्रात वाढ होण्यासाठी जल संधारणावर भर देण्याची गरज असल्याचे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी सांगितले.

Team Agrowon

Satara News : शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढविण्यासाठी नवीन तंत्रज्ञान व पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. तसेच सिंचनाखालील क्षेत्रात वाढ होण्यासाठी जल संधारणावर भर देण्याची गरज असल्याचे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी सांगितले.

कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव या कार्यालयाची शास्त्रीय सल्लागार समिती बैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्ष कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी. एस. पाटील उपस्थित होते.

प्रत्येक वर्षी कृषी विज्ञान केंद्रामध्ये होणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेऊन पुढील वर्षी करावयाच्या नियोजित कामकाजाची दिशा ठरविण्यासाठी शास्त्रीय सल्लागास समिती बैठकीचे आयोजन करण्यात येत असते. या कार्यक्रमात जिल्ह्यातील प्रगतिशील व पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा कुलगुरू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

डॉ. सी. एस. पाटील यांनी पिकावरील कीड रोग व्यवस्थापनासाठी एकात्मिक कीड रोग नियंत्रण पद्धती अवलंब करून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावे. बैठकीमध्ये कार्यक्रम समन्वयक डॉ महेश बाबर यांनी कृषी विज्ञान केंद्र आहे, त्याचा गत वर्षातील कार्याचा अहवाल सादर केला.

या बैठकीस अटारी पुणे येथील शास्त्रज्ञ डॉ. तुषार आठरे हे ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते. तसेच सहयोगी संशोधन संचालक, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, ऊस विशेषज्ञ, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, शास्त्रज्ञ कृषी संशोधन केंद्र, कऱ्हाड, प्रकल्प संचालक, आत्मा, प्रबंधक, जिल्हा अग्रणी बँक, कृषी विभागाचे अधिकारी व प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CJP Protest: तरुणांच्या आंदोलनाची धग वाढली, देशभरातून पाठिंबा, सरकारकडून चर्चेची तयारी, पण 'सीजेपी'ने ठेवल्या अटी

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, हरभरा आवक स्थिर, टोमॅटो भाव कायम,शेपू दबावातच तर मोसंबी दरात नरमाई

Government Schemes Planning: योजनांच्या लाभासाठी सक्षम प्रकल्प आराखडा महत्त्वाचा : अनिसा महाबळे

Tomato Mar Rog: टोमॅटो पिकातील जिवाणूजन्य मर रोगाची लक्षणे आणि उपाय काय?

Buldhana DCC Bank Election: बुलडाणा जिल्हा बँकेची निवडणूक ठरणार लक्षवेधी

SCROLL FOR NEXT