Agriculture Exhibition  Agrowon
ॲग्रो विशेष

Agrowon Agriculture Exhibition 2024 : ‘नवरदेव बीएस्सी ॲग्री’ अवतरला कृषी प्रदर्शनात

Agriculture Exhibition : बीएस्सी ॲग्री या चित्रपट ‘प्रमोशन’चे खास दालन ॲग्रोवन कृषी प्रदर्शनात उभारले असून, शेतकऱ्यांचे ते लक्ष वेधून घेत आहे. ‘ॲग्रोवन’ या चित्रपटाचा माध्यम प्रायोजक आहे.

Team Agrowon

Agriculture Expo 2024 : निव्वळ शेती करणाऱ्या उपवर शेतकरी मुलांना लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यासाठी त्यांना करावा लागणार संघर्ष नवरदेव बीएस्सी ॲग्री या चित्रपटातून मांडण्यात आला आहे.

त्याच्या ‘प्रमोशन’चे खास दालन ॲग्रोवन कृषी प्रदर्शनात उभारले असून, शेतकऱ्यांचे ते लक्ष वेधून घेत आहे. ‘ॲग्रोवन’ या चित्रपटाचा माध्यम प्रायोजक आहे.

हा चित्रपट येत्या २६ जानेवारीला राज्यातील सिनेमागृहांमधून प्रदर्शित होत आहे. आर्यन्स एज्युटेन्मेंट प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माते मिलिंद लडगे, तर लेखक दिग्दर्शक राम खाटमोडे आहेत. त्यांना विनोद वणवे यांनी साह्य केले आहे.

चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनसापुरे, प्रवीण तरडे, रमेश परदेशी, यांच्यासह क्षितीश दाते नायकाच्या तर प्रियदर्शनी इंदलकर नायिकेच्या भूमिकेत आहेत. शेतीचे शिक्षण घेऊन त्यानंतर शेतीत काम करण्याची मानसिकता असलेल्या तरुणांना लग्न करताना कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते हे या चित्रपटाच्या रंगतदार सादरीकरणातून दाखवण्यात आले आहे.

एका दाण्याचे हजार दाणे करण्याची क्षमता असलेल्या शेतकऱ्याला आजपर्यंत व्यावसायिक म्हणून खरी ओळख किंवा मान्यताच मिळालेली नाही. अनेक युवकांच्या मनातील ही खंत किंवा खदखद या निमित्ताने व्यक्‍त झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Project: कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देणार

Krishna Sugar Factory: कृष्णा कारखाना केनियातील साखर उद्योगासाठी प्रेरणादायी

CM Fadnavis: नगर-मनमाड खड्डेमय रस्त्यावर मुख्यमंत्र्यांचा प्रवास

Crop Loss Compensation: मागणी ५७० कोटींची, मिळाले ३८ कोटी

Natural Farming: जमीन सुपीकतेसाठी नैसर्गिक शेती महत्त्वाची

SCROLL FOR NEXT