Natural Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Natural Farming : जमिनीचा पोत टिकविण्यासाठी नैसर्गिक शेती उत्तम पर्याय

Dr. Murali Ingale : शेतकऱ्यांनी आपला उत्पादन खर्च कमी करून जमिनीचा पोत सुधारण्यावर भर द्यावा. या सर्व गोष्टी आपण नैसर्गिक शेतीद्वारे करू शकतो,’’ असे प्रतिपादन आत्मा प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे यांनी केले.

Team Agrowon

Akola News : ‘‘सध्या वातावरण बदलामुळे शेतीसमोर मोठी आव्हाने तयार झालेली आहेत. अशा परिस्थितीत अवर्षण, अतिवृष्टीच्या फेऱ्यातून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी शाश्वत शेतीला पर्याय नाही आणि त्यासाठी विषमुक्त, नैसर्गिक शेतीकडे जावे लागेल.

शेतकऱ्यांनी आपला उत्पादन खर्च कमी करून जमिनीचा पोत सुधारण्यावर भर द्यावा. या सर्व गोष्टी आपण नैसर्गिक शेतीद्वारे करू शकतो,’’ असे प्रतिपादन आत्मा प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे यांनी केले.

स्थानिक कृषी विज्ञान केंद्रात आयोजित नैसर्गिक शेती प्रशिक्षणाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.आत्माच्या माध्यमातून नैसर्गिक शेती अभियान राबविण्यात येत आहे. यानिमित्त प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. उमेश ठाकरे, गोपाळ मंजुळकर, कुलदीप देशमुख, स्वप्नील कोंडे, डॉ. चारुदत्त ठिपसे, आत्मा यंत्रणा तालुका तंत्र व्यवस्थापक व्ही. एम. शेगोकार उपस्थित होते. शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

यावेळी नैसर्गिक शेती गटाचे अध्यक्ष, सचिव, चॅम्पियन फार्मर, समूह संसाधन व्यक्तींची प्रामुख्याने उपस्थिती होती. नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण यशस्वी करण्याकरीता आत्माचे श्री. शेगोकार, सचिन गायगोळ, मंडळ कृषी अधिकारी

चंद्रकांत नावकार, कृषी साहाय्यक अनिल वानखेडे, दीपाली अटंबर, कृषी पर्यवेक्षक मोनाली बावणे, कृषी विज्ञान केंद्राचे केशव चतरकर, ऋतुजा खांदरे यांनी पुढाकार घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT