Turmeric Agrowon
ॲग्रो विशेष

National Turmeric Board : राष्ट्रीय हळद मंडळामुळे निर्यातीस चालना मिळेल

Turmeric Export News : वाणिज्य व उद्योग मंत्रालयाकडून राष्ट्रीय हळद मंडळ (बोर्ड) स्थापन झाल्यावर जगभरात हळद विषयक जागरूकता व दैनंदिन वापर वाढविण्यास साहाय्य होईल.

Team Agrowon

Hingoli News : वाणिज्य व उद्योग मंत्रालयाकडून राष्ट्रीय हळद मंडळ (बोर्ड) स्थापन झाल्यावर जगभरात हळद विषयक जागरूकता व दैनंदिन वापर वाढविण्यास साहाय्य होईल. निर्यातीला चालना मिळेल.

हळदीची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ विकसित होईल. संशोधन व विकास गतिमान होईल, असे प्रतिपादन वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष खासदार हेमंत पाटील यांनी केले.

पाटील म्हणाले, ‘‘हळद बोर्डाची स्थापना करावी यासाठी आपण २० डिसेंबर २०२१ रोजी तत्कालीन कृषी व किसान कल्याण राज्यमंत्री कैलास चौधरी व कृषी, किसान कल्याण केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. या मागणीची केंद्र सरकारने दखल घेत नुकतीच हळद बोर्डाच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली.

यामुळे हळदीचे मूल्यवर्धन करणे, उत्पादन विकसित करणे, मूल्यवर्धित उत्पादनांसाठी बाजारपेठ शोधणे आदी कामेही हळद मंडळ काम करेल. त्यासाठी हळद उत्पादकांना प्रशिक्षण देणे, त्यांच्या क्षमतांचा, कौशल्यांचा विकास करणे यावर भर दिला जाणार आहे.

राष्ट्रीय हळद मंडळ देशातील हळद व हळद उत्पादनांच्या विकास आणि वाढीवर लक्ष केंद्रित करणार आहे. हळदीशी संबंधित सर्वच बाबतीत पुढाकार घेऊन भूमिका बजावणार असून हळद क्षेत्राचा विकास आणि वृद्धी व्हावी यासाठी मसाले मंडळ आणि इतर सरकारी संस्थांमध्ये समन्वय साधून विविध योजनांची कार्यक्षमपणे अंमलबजावणी करण्याचे काम करणार आहे, असे पाटील यांनी नमूद केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Global Development Trust : ग्लोबल विकास ट्रस्टच्या कृषिकूलचे उद्घाटन

Agriculture University Promotion : कृषी विद्यापीठातील पदोन्नतीचे आदेश न काढणे कायदेशीर : आनंदकर

Agriculture University Rating : महात्मा फुले कृषी विद्यापीठाला ‘ए’ ग्रेड उत्कृष्ट मानांकन

Agriculture Department : ‘महसूल’ पाठोपाठ यंत्रणा असलेला कृषी विभाग विस्कळित

Soybean Rate : सोयाबीनच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांत संताप

SCROLL FOR NEXT