भरत उबाळे
Shahapur News: शहापूर तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्ग आणि मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर पाच वर्षांत भरधाव वाहनांची धडक बसून १६ वन्यजीवांना जीव गमवावा लागला आहे. यात बिबट्या, मुंगूस, भेकर, हरीण, तरस, वानर, घुबड, रानमांजर, डुक्कर आणि नीलगायींचा समावेश आहे.
भरधाव वाहनांच्या धडकेत वन्यजीवांचे मृत्यू झाल्याप्रकरणी शहापूर उपवनसंरक्षक कार्यालय, तसेच विभागातील वनक्षेत्रपाल कार्यालयात अज्ञात वाहनांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तरी धीम्या गतीमुळे त्यांचा तपास अद्यापही प्रलंबितच आहे. शहापूर तालुक्याच्या जंगलात विविध प्रजातींच्या वन्यजीवांचे मोठ्या संख्येने वास्तव्य आहे. अनेकदा तानसा अभयारण्यातील वन्यजीव भक्ष्याच्या शोधात महामार्गावर येतात.
सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर
काही दिवसांपूर्वीच वाहतूकीस खुला झालेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरही भरधाव वाहनांच्या धडकेने वन्यजीवांचे अपघात होण्याच्या घटना घडत आहेत.नुकताच शेरे गावाच्या हद्दीतील पुलावर वाहनाची धडक बसल्याने एका वानराचा मृत्यू झाल्याची नोंद वन विभागाच्या दप्तरी झाली आहे.
राष्ट्रीय महामार्गावर २४ तास वाहतूक सुरू असते. त्यातच वन्यजीवांचे दिवसेंदिवस वाढते अपघाती मृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे. यामुळे महामार्गावर वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.
भक्ष्यासाठी महामार्गावर
मुंबई-नाशिक-आग्रा महामार्ग आणि समृद्धी महामार्गांलगत तानसा हे वन्यजीव अभयारण्य आहे. अनेकदा या अभयारण्यातील वन्यजीव भक्ष्याच्या शोधात किंवा पाठलाग करत महामार्ग, रस्ते ओलांडतात. अशा वेळी मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गावर मोठ्या संख्येने वन्यजीवांच्या अपघाताच्या घटना घडत असतात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.