Onion Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage: नाशिकला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पुन्हा तडाखा

Nashik Unseasonal Rain: सिन्नर, येवला व निफाड तालुक्यात पावसाने हजेरी लावली. सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात गारपीट झाल्याने काढणी झालेल्या कांद्याचे नुकसान झाले.

मुकूंद पिंगळे

Nashik News: गेल्या सप्ताहात वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांना झोडपले असतानाच पुन्हा रविवारी (ता. १३) अवकाळी पाऊस व गारपिटी झाली. सिन्नर, येवला व निफाड तालुक्यात पावसाने हजेरी लावली. सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात गारपीट झाल्याने काढणी झालेल्या कांद्याचे नुकसान झाले.

सिन्नर तालुक्यातील पांगरी, निफाड तालुक्यात रानवड महसूल मंडलात वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस झाला. शिरवाडे वणी, आहेरगाव, गोरठाण, लोणवाडी परिसरात हलका ते मध्यम पाऊस होता. या पावसामुळे कांदा, मका, गहू व भाजीपाल्याचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात असताना द्राक्षांच्या दरात घसरण झाली आहे. त्यातच या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. अस्मानीच्या संकटात हातातोंडाशी आलेला घासही हिरावला जात आहे.

रविवारी येवला तालुक्याच्या पूर्व भागातील राजापूर, पिंपळखुटे, ममदापूर, सोमठाणे आदी भागांमध्ये अवकाळी पाऊस व गारपीट झाली. सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात दोनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारपिटीने तडाखा दिला. मेंढी तसेच धनगरवाडी व निमगाव शिवारात १५ ते २० मिनिटे वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट झाली.

या पावसामध्ये अनेक ठिकाणी काढणी करून कापणीसाठी ठेवलेला कांदा भिजला आहे. तो साठवणूक केल्यानंतर टिकणार नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पावसाच्या सरीवर सरी पडल्याने शेतकऱ्यांची धावपळ उडाली होती. तर अनेक ठिकाणी उघड्यावरील चारा भिजला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, गवार भावात घसरण, पालक आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार तर डाळिंब दरात बदल

NCC Colonel Commandant Degree: कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना मानद ‘कर्नल कमांडंट’ पदवी

Analog Paneer Ban: राज्यात कृत्रिम (एनालॉग) पनीरवर वर्षभराची बंदी

Water Conservation: श्रमदानातून पाणीदार झाले ‘सालईबन’

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

SCROLL FOR NEXT