Nashik Bogus Fertilizers agrowon
ॲग्रो विशेष

Nashik Bogus Fertilizers : बोगस खते, बियाणे विक्रीला आळा घालण्यासाठी १६ पथके

Bogus Fertilizers Seeds : खरीप हंगाम जवळ येत असल्याने शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा वेळेवर आणि गुणवत्तापूर्ण उपलब्ध व्हाव्यात म्हणून कृषी विभागाने तयारी सुरू केली आहे.

Team Agrowon

Nashik : खरीप हंगाम जवळ येत असल्याने शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा वेळेवर आणि गुणवत्तापूर्ण उपलब्ध व्हाव्यात म्हणून कृषी विभागाने तयारी सुरू केली आहे. खरीप हंगामात बोगस खते व बियाण्यांची विक्री होऊ नये या करिता जिल्हास्तरावर १ व प्रत्येक तालुकास्तरावर १ अशी एकूण १६ भरारी पथके तयार केली आहेत. या पथकांमार्फत बोगस खते व बियाणे विक्रीला आळा घालण्यात येणार आहे.

जिल्ह्यात खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी मागणीनुसार बियाणे आणि खते शेतकऱ्यांना मिळण्यासाठी तालुकास्तरावर सूक्ष्म नियोजन केले आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करताना कुणी आढळल्यास भरारी पथकाच्या माध्यमातून अचानक धाडी घालून वेळोवेळी तपासण्या केल्या जाणार आहेत. शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, सक्तीची कृषी निविष्ठाची लिंकिंग शेतकऱ्यांना केल्यास तत्काळ कायदेशीर कारवाई करण्याची सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे.

तालुकास्तरावर एक तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे. कृषी अधिकारी, पंचायत समिती हे या समितीचे सदस्य सचिव आहेत. खरीप हंगामात बोगस खते/बियाणे विक्री होऊ नये या करिता भरारी पथकांमार्फत बोगस बियाणे विक्रीला आळा घालण्यात येणार आहे, यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टळेल आणि अनधिकृतरित्या विक्री होणाऱ्या बोगस बियाणे व खते विक्रीला लगाम घालण्यास मदत होईल, असे सांगण्यात आले.

जिल्ह्यात मुबलक प्रमाणात बियाणे आणि खत उपलब्ध होतील. गुरुवारी (ता. २२) १,१०,३३१ टन खत व ९७,५९९ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अभिमन्यू काशीद यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

Government Assistance: शेतकरी आत्महत्येची आठ प्रकरणे मदतीसाठी पात्र

Marathwada Rain Deficit: मराठवाड्यात पावसाच्या तुटीमुळे पेरणी क्षेत्रात ७ टक्क्यांची घट

Buldhana DCC Bank: बुलडाणा जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT