Sand Mining  Agrowon
ॲग्रो विशेष

Sand Excavation : वाळू ठेक्याविरोधात नांद्रा ग्रामस्थ आक्रमक

Sand Mining : या परिसरात ट्रॅक्टर, डंपर आदींच्या वाळू उपशामुळे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण निर्माण होत असून, पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे.

Team Agrowon

Jalgaon News : तालुक्यातील नांद्रा येथील ग्रामस्थांसह महिलांनी वाळू गटातून वाळू उचल करण्यास विरोध दर्शवत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. दरम्यान, याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जनसुनावणी घेतली. लवकरच त्याबाबत निर्णय जाहीर केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

या परिसरात ट्रॅक्टर, डंपर आदींच्या वाळू उपशामुळे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण निर्माण होत असून, पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. यामुळे तालुक्यातील नांद्रा, पिलखेडा परिसरातील गिरणा नदी पात्रातील वाळू ठेक्याच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थांसह महिलांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले.

ग्रामस्थांनी ‘वाळू ठेका रद्द करा’ अशा घोषणा देत आपला विरोध नोंदवला. जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामस्थांसह महिलांनी काही वेळ ठिय्या मांडल्याने तणाव निर्माण झाला होता.

उचल करण्यास विरोध

गिरणा, तापी, वाघूर यासह नदी नाल्यांमधील वाळू उचल करण्यासाठी शासनाच्या धोरणानुसार ‘ई-ऑक्शन’ लिलाव करण्यात आले आहेत.

यात पर्यावरण विभागाकडून स्थानिक तहसीलदार व महसूल विभागांतर्गत नियुक्त समितीतर्फे वाळू गटांसाठी जनसुनावणी घेण्यात आली आहे. असे असले तरी काही ठिकाणी वाळू उचल करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांकडून विरोध दर्शविला जात आहे.

उपसा मात्र सर्वच ठिकाणी

जिल्ह्यात शंभरावर वाळू गट आहेत. त्यापैकी ई ऑक्शन लिलाव शासन निर्देशानुसार पर्यावरण विभागाची जनसुनावणी होऊन जाहीर करण्यात आले आहेत. या वाळू गटांपैकी फक्त तीन वाळू गटांचे ई ऑक्शन लिलाव झाले आहेत.

जळगाव तालुक्यात गिरणा नदी पात्रात नांद्रा आणि पिलखेडा गावालगत, चाळीसगाव तालुक्यात रहिपुरी आणि पाचोरा तालुक्यात माहिजी असे तीनच वाळू गटाचे ई ऑक्शन लिलाव झाले आहेत. परंतु जिल्ह्यात तापी, गिरणा आणि अन्य नदी-नाले पात्रात वाळू गटाचे लिलाव झालेले नाहीत. या वाळू उपशाला अनेक कंगोरे असून, आर्थिक देवाण घेवाण, भाऊबंदकी, उघड, लपून- छपून हितसंबध, भागीदारी असल्याचे बोलले जाते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Crop Damage: एका दिवसात ८४६८ हेक्टरला फटका

Ahilyanagar Crop Damage: अहिल्यानगरमध्ये पूर्वमोसमी पावसाचा पिकांना फटका

Food Processing License: अन्नप्रक्रिया परवाना नूतनीकरणाची अट रद्द

Revenue Department: शासकीय तिजोरीत ६१ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा

Lemon Price Drop: ऐन उन्हाळ्यात लिंबांच्या दरात घसरण

SCROLL FOR NEXT