Kharif Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : नांदेडला ज्वारी, उडीद, मुगाच्या पेरणीत यंदाही घट

Kharif Season : यंदा जिल्ह्यात सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ९९.२८ टक्क्यांनुसार सात लाख ५६ हजार ६१ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

कृष्णा जोमेगावकर

Nanded News : जिल्ह्यात खरीप हंगाम २०२५-२०२६ मधील पेरणीचा अंतिम अहवाल नुकताच अंतिम झाला आहे. यंदा जिल्ह्यात सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ९९.२८ टक्क्यांनुसार सात लाख ५६ हजार ६१ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

यात सर्वाधिक चार लाख ५५ हजार ८७१ हेक्टरवर सोयाबीन, तर एक लाख ९७ हजार ६४२ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. परंतु जिल्ह्यात मागच्या वर्षी प्रमाणेच खरीप ज्वारी, उडीद व मुगाच्या पेरणी क्षेत्रात लक्षणीय घट दिसून येत आहे.

नांदेड जिल्ह्याचे खरीप हंगामात सात लाख ६१ हजार ५७४ हेक्टर सर्वसाधारण पेरणी क्षेत्र आहे. यंदा मृग नक्षत्रात खरिपातील पेरण्यांना प्रांरभ झाला. या पेरण्या जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात आटोपल्या. यंदा खरिपातील पेरण्या वेळेत झाल्याने पिकांची वाढही समाधानकारक झाली.

दरम्यान जिल्ह्यात सात लाख ६१ हजार ५७४ हेक्टर सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ९९.२८ टक्यांनुसार सात लाख ५६ हजार ६१ हेक्टरवर पेरण्या झाल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली.

यात सर्वाधिक चार लाख ५५ हजार ८७१ हेक्टरवर सोयाबीन, एक लाख ९७ हजार ६४२ हेक्टरवर कपाशी, ६० हजार ९२९ हेक्टरवर तूर, १५ हजार २१९ हेक्टरवर मूग, १४ हजार १९९ हेक्टरवर उडीद, ६ हजार ९२१ हेक्टरवर खरीप ज्वारीची लागवड झाल्याची माहिती जिल्हाअधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या सूत्राने दिली.

दरम्यान, जिल्ह्यात मागील काही वर्षापासून खरीप ज्वारी, कपाशी, उडीद व मुगाच्या पेरणी क्षेत्रात सातत्याने घट होत आहे. खरीप ज्वारीचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र २४ हजार २५१ हेक्टर असताना यंदा केवळ २८.६६ टक्क्यांनुसार सहा हजार ९२१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तसेच मुगाचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र ७० हजार २२२ हेक्टर असताना यंदा केवळ ६० हजार ९२९ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

Kharif Season

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Incentive Subsidy Scheme : पात्र शेतकऱ्याला प्रोत्साहन अनुदानापासून वंचित ठेवले

Kukadi Water Storage: ‘कुकडी’त ६८ टक्के पाणीसाठा

Agrowon Podcast: मक्याचा बाजार स्थिर; कापूस दर स्थिर, टोमॅटोमध्ये काहीसे चढ उतार, तर डाळिंब व केळीला चांगली मागणी कायम

Mhaisal Lift Irrigation : ‘म्हैसाळ’साठी सौरऊर्जा प्रकल्पाचा नव्या वर्षात प्रारंभ

Wildlife Crop Damage : शाहूवाडीत वन्यप्राण्यांचा धुमाकूळ, शेतीचे नुकसान

SCROLL FOR NEXT