Balasaheb Thackeray Agribusiness and Rural Transformation Project Agrowon
ॲग्रो विशेष

Smart Project : नांदेडला ‘स्मार्ट’अंतर्गत १८ उपप्रकल्पांना मान्यता

Team Agrowon

Nanded News : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत नांदेड जिल्ह्यात १८ उपप्रकल्पांना अंतिम मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्प अहवालाची रक्कम ४१ कोटी ३० लाख रुपये तर अनुदान २४ कोटी ७८ लाख आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ३६ प्रकल्पांना प्राथमिक मान्यता मिळाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) हा जागतिक बँक अर्थसहाय्यीत प्रकल्प आहे. शेतकऱ्यांना देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेत प्रवेश मिळवून देण्यासाठी त्यांना लागणारे आवश्यक तांत्रिक सहाय्य, पायाभूत सुविधेसाठी अर्थसाहाय्य या प्रकल्पांतर्गत दिले जाणार आहे.

या प्रकल्पामध्ये मूल्यसाखळी विकासावर भर देण्यात आला आहे. शेतमालाच्या उत्पादनापासून ग्राहकांपर्यंतच कामे व ती कामे करणाऱ्या सर्व घटकांची ही साखळी राहणार आहे. या साखळीमुळे उत्पादित शेतमालाची मालकी एका घटकाकडून दुसऱ्या घटकाकडे जाते आणि या प्रक्रियेत शेतमालाच्या किमतीत वाढ (मूल्यवृद्धी) होते. या साखळीमध्ये शेतमालाच्या उत्पादनपुर्व कृषी निविष्ठा पुरवठा करणाऱ्यांपासून शेतमालाचा उपभोग घेणाऱ्या ग्राहकांपर्यंत पर्यंत सर्व घटकांचा व त्यांच्या कामाचा समावेश आहे.

या उपप्रकल्पामध्ये समुदाय आधारित संस्था व खरेदीदारांचा समावेश आहे. हे दोन्ही भागधारक आरखडयाच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले जाणार आहेत. यातून उत्पादक व खरेदीदारांमध्ये दीर्घकाळ टिकाऊ, शाश्वत आणि व्यावसायिक संबंध विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पांर्गत नांदेड जिल्ह्यात ३८ उपप्रकल्पाचे लक्षांक प्राप्त झाले आहे. आजपर्यंत अर्ज ३६ उपप्रकल्पांना प्राथमिक मान्यता देण्यात आली.

या प्रकल्पाची रक्कम ४१ कोटी ३० लाख रुपये आहे. तर या ३८ उपप्रकल्पांना स्मार्टमधून ६० टक्क्यांनुसार २४ कोटी ७८ लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. आजवर ११ उपप्रकल्पांना सात कोटी ५० लाखांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. १२ संस्थांना बँकांनी कर्ज मंजूर केले आहे. पाच उपप्रकल्पांत गोदाम बांधकाम सुरु झाले आहे. तर १५ नव्याने अर्ज दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील पात्र समुदाय आधारित संस्थानी अर्ज करण्याचे आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक अनील गवळी, नोडल अधिकारी अरुण घुमणवाड यांनी केले आहे.

दहा उपप्रकल्प सोयाबीन प्रक्रियेवर आधारित

जिल्ह्यात सध्या अंतिम मंजूर झालेल्या १८ उपप्रकल्पांपेकी १० सोयाबीन प्रक्रियेवर आधारित प्रकल्प आहेत. तर दालप्रक्रिया पाच व हळद प्रक्रियेवर तीन उपप्रकल्प उभारण्यात येत आहेत. यात शिवखांडी एफपीओ, शितलादेवी एफपीओ, के. संभाजी पवार एफपीओ, राजे मल्हारराव होळकर एफपीओ, श्रावणी श्रेयशी एफपीओ, चंद्रगुप्त मोर्य एफपीओ, शिवलिंग बादशाह एफपीओ, धर्माबाद ऍग्रो, ग्रीनओझोन ऍग्रो आदी शेतकरी उत्पादक कंपन्यांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Harvesting : सोयाबीनची उंची वाढली, उत्पन्न कमीच

Irrigation Subsidy : सिंचन अनुदान रखडल्याने आर्थिक संकट

Farmers Issue : कृषी विभागाचे नियंत्रण नसल्याने शेतकरी नडला जातोय

Sangli APMC : व्यापारी, हमाल वादावर तोडगा काढण्यासाठी समिती

Nuksan Bharpai : १८ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अवकाळी व अतिवृष्टिचा मदत निधी

SCROLL FOR NEXT