Land  Agrowon
ॲग्रो विशेष

Land Ownership : खरेदीनंतर मूळ मालकाचे नाव करा कमी

Land Information : जमीन खरेदी देणाऱ्या जमीन मालकाचे नाव कमी झाले किंवा नाही, याची खात्री जमीन खरेदी घेणाऱ्याने करणे अत्यंत आवश्यक आहे.

शेखर गायकवाड

Village Story : एका गावात किसनराव नावाचा एक शेतकरी राहत होता. किसनरावने जानराव व इतर चार शेतकऱ्यांकडून शेतजमीन खरेदी केली. जमिनीची खरेदीखतानुसार फेरफार नोंद सुद्धा करण्यात आली. परंतु फेरफार मंजूर झाल्यावर सुद्धा तलाठ्याकडून नजरचुकीने जानराव या मूळ मालकाचे व खरेदी देणाऱ्याचे नाव सातबाराला तसेच राहून गेले होते. जानरावला या गोष्टीचा फार फायदा झाला असे त्याला वाटले.

जानरावने पैशाच्या लालसेपोटी इतर काही लोकांना ती जमीन विकायची आहे असे सांगितले. त्यानुसार लोक जमीन बघून जात होते. पण किसनरावला विकलेली जमीन कोणती व राहिलेले क्षेत्र कोणते हे काही जानरावला सांगता येईना. त्यात जानरावला एक इसम पांडुरंग तीच जमीन खरेदी करणारा मिळाला, तेव्हा जानरावने क्षणाचाही विलंब न करता त्याच जमिनीची पुन्हा पांडुरंगला विक्री केली.

त्यानंतर मात्र खटल्याची मालिका सुरू झाली. दिवाणी कोर्टात खरेदीखत रद्द करायचा व महसुली कोर्टात फेरफार नोंद रद्द करण्याचा प्रयत्न सुरू झाला. महसुली कोर्टात दोन वेळा दावे चालले. महसुली कोर्टात या सर्वांचा वेळ तर वाया गेलाच शिवाय वकिलांवर भरमसाट खर्च झाला तो वेगळाच!

किसनरावला या गोष्टीचा फार पश्चात्ताप झाला. त्याला पुढे काय करावे काहीच सुचत नव्हते. खरेदी केलेल्या जमिनीचा उतारा घेताना जानरावकडून जमीन खरेदी केली तेव्हा जानरावचे नाव कमी झाले किंवा कसे, याची खात्री किसनरावने वेळीच केली असती, तर हा पुढचा एवढा मोठा अनर्थ टळला असता.

सांगावयाचे तात्पर्य म्हणजे जमीन खरेदी देणाऱ्या जमीन मालकाचे नाव कमी झाले किंवा नाही, याची खात्री जमीन खरेदी घेणाऱ्याने करणे अत्यंत आवश्यक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT