NABARD  Agrowon
ॲग्रो विशेष

Rural Development : ग्रामविकासात ‘नाबार्ड’ची भूमिका मैलाचा दगड

NABRAD : देशाच्या ग्रामीण विकासात राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बॅंकेने (नाबार्ड) गेल्या चार दशकांत बजावलेली भूमिका मैलाचा दगड ठरली आहे.

मनोज कापडे

Pune News : देशाच्या ग्रामीण विकासात राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बॅंकेने (नाबार्ड) गेल्या चार दशकांत बजावलेली भूमिका मैलाचा दगड ठरली आहे. तसेच, ग्रामीण अर्थकारणाला चालना देणाऱ्या धोरणांचे प्रतिबिंब नाबार्डच्या कामात दिसून येतेे, असे गौरवोद्गगार केंद्रीय अर्थ सचिव एम. नागाराजू यांनी काढले.

‘नाबार्ड’चा ४४ वा स्थापना दिन चेन्नईत उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. तमिळनाडूचे मुख्य सचिव एम. मुरुगनंदन, नाबार्डचे अध्यक्ष के. व्ही. शाजी, उपव्यवस्थापकीय संचालक जी. एस. रावत, ए. के. सूद तसेच देशाच्या बॅंकिंग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

श्री. नागाराजू म्हणाले, ‘हवामान बदलाची आव्हाने व डिजिटल क्षेत्रातील संधी यातून आपली वाटचाल चालू आहे. परंतु, देशाच्या ग्रामीण लोकजीवनाला अधिक समृद्ध करण्यात इतर कोणत्याही संस्थेपेक्षा नाबार्डची भूमिका यापुढेही मोलाची ठरणार आहे.

’ श्री. शाजा म्हणाले, की देशाच्या कृषी पतपुरवठ्यात, ग्रामीण विकासात तसेच डिजिटल अर्थक्रांतीत नाबार्डची वाटचाल उपयुक्त ठरली. आता ग्रामीण भागाच्या उद्यमशीलतेला चालना व शाश्वत विकासाला प्रोत्साहन देण्याची भूमिका नाबार्डची राहील.

तमिळनाडूचे मुख्य सचिव श्री. मरुगनंदन यांनी, स्वयंसहायता गट, पायाभूत सुविधा व वित्तपुरवठा क्षेत्रात नाबार्डने केलेल्या योगदानाचे कौतुक केले. या वेळी नाबार्डच्या विविध उपक्रमांचा प्रारंभ व पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा सरी शक्य; उन्हाचा चटका कायम

Ratoon Sugarcane: खोडवा उसावरील एल निनोच्या उष्णतेचा ताण कसा कमी करावा?

Farmers Protest: शेतकरी अडचणीत, ऊस दर, धान खरेदी प्रश्नी राकेश टिकेत आक्रमक, मोठ्या आंदोलनाचा इशारा

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT