Chandrababu Naidu Agrowon
ॲग्रो विशेष

Chandrababu Naidu : चंद्राबाबू नायडूंनी घेतली चौथ्यांदा आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ; उपमुख्यमंत्री पवन कल्याण

N Chandrababu Naidu Oath : चंद्राबाबू नायडू यांनी चौथ्यांदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावेळी त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून पवन कल्याण यांनी देखील शपथ घेतली.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : देशात मोदी यांच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा सरकार स्थापन झाल्याबरोबर आंध्र प्रदेशातही एनडीएचे सरकार सत्तेत आले आहे. येथे तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी (ता.१२) चौथ्यांदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. विजयवाडा येथील केसरपल्ली आयटी पार्क येथे झालेल्या भव्य शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि बंदी संजय कुमार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. नायडू यांनी चौथ्यांदा राज्याची सूत्रे घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी नायडूंना मिठी मारून त्यांचे अभिनंदन केले.

देशाची सत्ता पुन्हा एकदा मोदी यांच्या नेतृत्वात महायुतीच्या हातात गेली. दोनच दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या शपथ विधा पार पडता. त्यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यापाठोपाठ बुधवारी महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांनी आध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. नायडू यांच्यासोबत जनसेना प्रमुख आणि अभिनेता पवन कल्याण यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच नायडू यांचा मुलगा नारा लोकेश याने देखील मंत्रीपदाची शपथ घेतली.

किती जणांचा शपथविधी

चंद्राबाबू नायडू यांच्या नवीन सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह २५ सदस्य आहेत. यामध्ये टीडीपीच्या २०, जनसेनेच्या ३ आणि भाजपच्या एका मंत्र्यांचा समावेश असून एक पद रिक्त ठेवण्यात आले आहे.

चौथ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ

यापूर्वी चंद्राबाबू नायडू यांनी १ सप्टेंबर १९९५, ११ ऑक्टोबर १९९९ आणि ८ जून २०१४ रोजी तीनदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वायएसआरसीपीचे अध्यक्ष जगन मोहन रेड्डी यांनी टीडीपीचा पराभव केला. तसेच आध्र प्रदेशची मुख्यमंत्री म्हणून सत्ता आपल्या हाती घेतली. पण आता २०२४ मध्ये चंद्राबाबू नायडू यांनी २०१९ चा वचपा काढत जगन मोहन रेड्डी यांना खाली खेचलं आहे. तर चौथ्यांदा २०२४ मध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

नारा लोकेश

आंध्र प्रदेशात टीडीपीचे सरकार स्थापन झाले असून चंद्राबाबू नायडू यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. टीडीपी सरकारमध्ये आता त्यांचे पुत्र नारा लोकेश यांनी देखील राज्य कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

विधानसभेचा फार्म्यूला

आंध्र प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्यावेळी टीडीपी, भाजप आणि जनता सेना पक्ष (जेएसपी) यांनी एकत्र निवडणुका लढवल्या होत्या. तर जागा वाटपाच्या फार्म्यूल्यानुसार विधानसभेच्या १७५ जागांपैकी टीडीपीने १४४ जागांवर, जनसेना पक्षाने २१ जागांवर आणि भाजपने १० जागांवर उमेदवार देवून निवडणूक लढवली होती.

विधानसभा निवडणुकीचे निकाल

तर ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीसह विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. त्यात नायडूंच्या टीडीपीने १३५ जागांवर मजल मारत राज्यातील सर्वात मोठा पक्ष झाला. यापाठोपाठ पवन कल्याणच्या जनसेनेला २१ जागा जिंकला आल्या. तर भाजपला ८ जागा राखत्या आल्या. सध्या आंध्र प्रदेशमध्ये युतीच्या १६४ जागा झाल्या असून जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआरसीपीला केवळ ११ जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला राज्यात खातेही उघडता आले नाही.

तर लोकसभेत टीडीपीचे १६ खासदार

यादरम्यान लोकसभेच्या राज्यातील २५ जागांपैकी महायुतीला २१ जागा जिंकता आल्या आहेत. यामध्ये टीडीपी १६, भाजप ३ आणि जनसेना पक्षाने २ जागा जिंकल्या आहेत. वायएसआरसीपीला ४ जागा मिळाल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Rate : सोयाबीनच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांत संताप

Controversial Sujay Vikhe Sabha : सुजय विखेंच्या सभेतील ‘त्या’ वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Mahavikas Aghadi : ‘मविआ’चे ६३ उमेदवार जाहीर

Banana Market : केळी दांड्याचे वजन एक किलो गृहीत धरले जाईना

Ravikant Tupkar : ‘क्रांतिकारी शेतकरी संघटना आघाडीबरोबर जाणार नाही’

SCROLL FOR NEXT