Mulberry Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Mulberry Cultivation : दोनशे एकरांवर यंदा होणार तुती लागवड

Mulberry Farming : रेशीम उद्योग करण्यासाठी जिल्ह्यातील १८२ शेतकऱ्यांनी २०३ एकर तुती लागवडीच्या उद्देशाने नोंदणी केली आहे.

Team Agrowon

Washim News : वाशीम जिल्ह्यात शेतकऱ्यांना पारंपरिक पिकांसोबतच अधिक उत्पन्न मिळावे या उद्देशाने रेशीम शेतीला चालना दिली जात आहे. रेशीम उद्योग करण्यासाठी जिल्ह्यातील १८२ शेतकऱ्यांनी २०३ एकर तुती लागवडीच्या उद्देशाने नोंदणी केली आहे.

जिल्ह्यात या वर्षी २०० एकरांपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी केली जाणार आहे. यापैकी ५६ एकरावर मनरेगाअंतर्गत तुती लागवड होणार आहे. उर्वरित १४७ क्षेत्रावर सिल्क समग्र -२ या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत लागवडीचे नियोजन केले आहे.

जून ते सप्टेंबर या कालावधीत तुती लागवड केली जाते. पूर्वी तुतीच्या फांदीपासून कलम तयार करून लागवड केली जायची. परंतु त्यामध्ये २० ते २५ टक्के तूट /खाडे पडायचे. त्यामुळे एकरी ५ हजार ५०० झाडांची संख्या राखली जात नव्हती. पर्यायाने प्रती एकरी २०० अंडीपुंजाचे संगोपन होत नव्हते. आता तुतीच्या ३ महिने पूर्ण वाढ झालेल्या रोपांची लागवड केली जाते.

प्रती रोप ३ ते ४ रुपये किंमत असते. मनरेगाअंतर्गत ३ रुपयांप्रमाणे ६ हजार रोपांचे १८ हजार दिले जातात. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात आलेगाव, अंबाशी, पाचरण या गावांत मोठ्या प्रमाणात तुती रोपवाटिका उभ्या राहिलेल्या आहेत. त्यांनी फेब्रुवारी ते मार्चमध्ये रोपे तयार केली आहेत. तेथे २५ ते ३० लाख रोपे तेथे उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी रोपे आरक्षित करून ठेवली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Input: बनावट निविष्ठांचे जाळे राज्यांच्या सीमापार

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवरील आंदोलन आणि सप्तपर्णीची अ‍ॅलर्जी

Fake Pesticide Issue: बनावट कीडनाशके : हवी सक्षम यंत्रणा

Tissue Culture Lab Scheme: उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अर्जाची संधी

Agriculture Services Reform: कृषी विभागाच्या अकरा सेवांचे डिजिटल सुसूत्रीकरण

SCROLL FOR NEXT