Electricity Meter Agrowon
ॲग्रो विशेष

Electricity TOD Meter : ‘टीओडी’ मीटरमुळे वीजबिलावर राहणार ग्राहकांचेच नियंत्रण

MSEDCL : महावितरणमार्फत बसविण्यात येणाऱ्या टीओडी (टाइम ऑफ डे) मीटरमुळे ग्राहकांना त्यांच्या वीज वापराची माहिती दर तासानुसार (रियल टाइम) उपलब्ध होणार आहे.

Team Agrowon

Solapur News : महावितरणमार्फत बसविण्यात येणाऱ्या टीओडी (टाइम ऑफ डे) मीटरमुळे ग्राहकांना त्यांच्या वीज वापराची माहिती दर तासानुसार (रियल टाइम) उपलब्ध होणार आहे.

त्यामुळे ग्राहकांचे त्यांच्या वीज वापरावर व पर्यायाने वीजबिलावर नियंत्रण राहणार आहे. टीओडी मीटर हे ग्राहकांच्या फायद्याचेच असून, ग्राहकांनी अफवांना बळी पडू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.

हे अद्ययावत मीटर बसविल्याने महावितरणची वाणिज्यिक हानी कमी होणार आहे. तसेच वीजचोरीवर नियंत्रण येणार आहे. त्यामुळे होणाऱ्या महसूल वाढीतूनच टीओडी मीटरचा खर्च भागविण्यात येणार आहे.

टीओडी मीटरमधून वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक युनिटची रिअल टाइम माहिती ही ग्राहकास मोबाइलवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वीज वापरानुसार रीडिंग येत नसेल, तर ग्राहकास हे कळणार आहे.

बसवण्यात येणारे टीओडी मीटर हे राष्ट्रीय मानांकन प्राप्त लॅबमधून चाचणी केलेले असल्याने ग्राहकांना वापरा इतकेच वीजबिल मिळणार आहे. अत्यंत नावीन्यपूर्ण अशी पारदर्शी सुविधा वीज ग्राहकांना नव्या टीओडी मीटरमुळे मिळणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Input: बनावट निविष्ठांचे जाळे राज्यांच्या सीमापार

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवरील आंदोलन आणि सप्तपर्णीची अ‍ॅलर्जी

Fake Pesticide Issue: बनावट कीडनाशके : हवी सक्षम यंत्रणा

Tissue Culture Lab Scheme: उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अर्जाची संधी

Agriculture Services Reform: कृषी विभागाच्या अकरा सेवांचे डिजिटल सुसूत्रीकरण

SCROLL FOR NEXT