Maharashtra Public Service Commission (MPSC) Agrowon
ॲग्रो विशेष

MPSC Recruitment :एमपीएससीकडून ३८५ जागांसाठी भरती; महसूल, सार्वजनिक बांधकाम, सामान्य प्रशासन विभागात जागा

MPSC vacancies : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २०२५ च्या वेळापत्रकानुसार राज्यसेवा परीक्षेची जाहिरात उशिरा निघाल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

sandeep Shirguppe

MPSC Department Recruitment : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. विविध विभागांर्तग ३८५ जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही परीक्षा 28 सप्टेंबरला होणार असून राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर होणार आहे. असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सांगण्यात आली आहे.

विभागनिहाय सामान्य प्रशासन विभागाकडून (राज्यसेवा) १२७ जागांसाठी अर्ज करता येणार आहे. महसूल व वन विभाग (महाराष्ट्र वनसेवा) १४४ जागा आहेत. तर सार्वजनिक बांधकाम विभाग (स्थापत्य अभियांत्रिकी सेवा) विभागाकडून ११४ जागांसाठी भरती होणार आहे. आयोगाने प्रसिद्ध केलेल्या राज्यसेवा परीक्षेच्या जाहिरातीनुसार २८ मार्च ते १७ एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्जासाठी ऑनलाईन शुल्क १७ एप्रिल ते २१ एप्रिलपर्यंत चालनद्वारे भरता येणार आहे.

मागच्या दोन महिन्यांपासून आयोगाकडून परीक्षेची जाहिरात सतत पुढे ढकलत होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २०२५ च्या वेळापत्रकानुसार राज्यसेवा परीक्षेची जाहिरात उशिरा निघाल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, परिक्षा जाहीर झाल्याने लाखो विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली असून मंगळवारी (ता.१८) आयोगाने जाहीरात प्रसिद्ध केली. ३८५ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेल्या परिक्षेसाठी राज्यातील लाखो विद्यार्थी अर्ज भरण्याची शक्यता आहे.

अधिक माहितीसाठी एमपीएससीच्या संकेतस्थळाला भेट द्या

महाराष्ट्रातील राज्य सेवा आयोगाच्या भरतीसंदर्भात माहिती मिळवण्यासाठी, आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. जिथे भरती प्रक्रिया, वेळापत्रक आणि इतर आवश्यक माहिती उपलब्ध आहे. परीक्षेचे वेळापत्रक आणि इतर महत्वाच्या तारखा एमपीएससीच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केल्या जातात. अर्ज भरताना आणि परीक्षेसाठी तयारी करताना, एमपीएससीच्या वेबसाइटवर दिलेल्या सूचनांचे पालन करावे लागते. पुणे येथे राज्य लोकसेवा आयोगाचे कार्यालय आहे, जिथे तुम्ही अधिक माहितीसाठी संपर्क साधू शकता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT