Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Payout : शेतकऱ्यांना पीकविमा परतावा तत्काळ द्यावा

Nanded Crop Insurance : नांदेड जिल्ह्यातील वर्ष २०२४ मधील विविध पिकांचा पीक विमा लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही जमा झाला नसल्याने शेतकरी सध्या आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत.

Team Agrowon

Nanded News : नांदेड जिल्ह्यातील वर्ष २०२४ मधील विविध पिकांचा पीक विमा लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही जमा झाला नसल्याने शेतकरी सध्या आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. सर्व पिकांच्या पीक विम्याची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ जमा करावी, अशी मागणी खा. रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी (ता. ३०) लोकसभेत केली.

लोकसभेत बोलत असतांना खासदार रवींद्र चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भातील जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या विषयांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले. दीड महिन्यांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील मुदखेड, अर्धापूर, भोकर, हदगाव येथील केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

यासंदर्भाने केंद्र सरकारचे याविषयाकडे लक्ष वेधत केळी उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला, परंतु विमा कंपनीने चालू वर्षात केळी पीकविमा नामंजूर केला आहे असे खासदार चव्हाण यांनी सरकारला लक्षात आणून दिले.

सरकारने केळी पीकविमा मंजूर करत नांदेड जिल्ह्यात दर्जेदार स्वयंचलित हवामान केंद्रांची (ऍटोमॅटीक वेदर स्टेशन) उभारणी करावी अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

खासदार रवींद्र चव्हाण यांनी लोकसभेत बोलताना शेतकऱ्यांच्या संदर्भातील विविध मागण्यांकडे केंद्र सरकारचे ध्यान आकर्षित केल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

७ ऑगस्ट कृषी विद्यार्थी दिन

हरितक्रांतीचे जनक डॉ. स्वामीनाथन यांची ७ ऑगस्ट रोजी जयंती आहे. कृषी क्षेत्रात डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचे योगदान लक्षात घेऊन ७ ऑगस्ट रोजी त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय कृषी विद्यार्थी दिन साजरा करावा, अशीही मागणी चव्हाण यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Talathi Recruitment 2026: तलाठी भरतीत कोतवालांना प्राधान्य, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत

Native Seed Conservation: देशी वाणांच्या थेट विक्रीतून उभारले अर्थकारण

El Nino Impact: जागतिक शेतीमाल बाजाराला दुहेरी झटका

Fertilizer Black Marketing : खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी देशभरात १.६९ लाख धाडी; महाराष्ट्रात सर्वाधिक कारवाई, लोकसभेत सरकारची माहिती

Gen Z Student Protest: ‘जेन झी’ आंदोलनाच्या निमित्ताने...

SCROLL FOR NEXT