MP Nilesh Lanke  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : कुकडीचे आवर्तन सोडण्याची नीलेश लंके यांची मागणी

Water Crisis : अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतांश भागात सध्या तीव्र स्वरूपाचा उन्हाळा असून, सर्वच ठिकाणच्या पाण्याचे उगम आटून गेले आहेत.

Team Agrowon

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतांश भागात सध्या तीव्र स्वरूपाचा उन्हाळा असून, सर्वच ठिकाणच्या पाण्याचे उगम आटून गेले आहेत. त्यामुळे पिण्याचे पाणी, शेतीसाठीचे व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

या पार्श्वभूमीवर कुकडी प्रकल्पाचा लाभ मिळत असलेल्या भागांसाठी कुकडीतून आवर्तन सोडण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. खासदार नीलेश लंके यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील पारनेर, श्रीगोंदे, कर्जत तालुक्यांतील शेती पुणे जिल्ह्यातील कुकडी प्रकल्पावर अवलंबून आहे.

कुकडी प्रकल्पातून उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून आहे. या तिन्ही तालुक्यांत माणसांच्या पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

माणसांच्या पिण्याच्या पाण्यासह फळबागांना पाणी, जनावरांच्या पिण्यासाठी पाणी व चाऱ्यासाठी कुकडी प्रकल्पातून पाणी सोडणे अत्यंत गरजेचे आहे.

पिंपळगाव जोगा धरणामध्ये उपलब्ध असलेल्या मृत साठ्यातून साडेतीन टीएमसी पाणी कुकडी डाव्या कालव्यात सोडण्याबाबत शासनस्तरावर परवानगीसह आदेश संबंधितांना देण्यात यावेत, अशी विनंती खासदार लंके यांनी या निवेदनात केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT