Onion Rate Solapur agrowon
ॲग्रो विशेष

Onion Rate Solapur : सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक कांदा लागवड, ३ ते ५ हजाराचा मिळणार दर?

Onion Production : हेक्टरी १४ मे.टन कांदा उत्पादन होते. यंदा सोलापूर जिल्ह्यात पाच लाख ६० हजार मे.टन कांदा उत्पादन होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे.

sandeep Shirguppe

Onion Cultivation Solapur : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाला आहे. दरम्यान समाधानकारक पावसामुळे पिकांना याचा फायदा झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातही यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून उजनी धरणाबरोबर जिल्ह्यातील लघू-मध्यम प्रकल्पातही मुबलक पाणीसाठा आहे.

या पार्श्वभूमीवर गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात कांद्याची लागवड वाढली आहे. मागच्या वर्षी सोलापूर जिल्ह्यात २९ हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली होती. यावर्षी ४० हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली असून अजूनही लागवड सुरूच आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, बार्शी, करमाळा, माळशिरस, पंढरपूर या तालुक्यांमध्ये यंदा कांदा लागवड सर्वाधिक झाला आहे. हेक्टरी १४ मे.टन कांदा उत्पादन होते. यंदा सोलापूर जिल्ह्यात पाच लाख ६० हजार मे.टन कांदा उत्पादन होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. जिल्ह्यातील कांदा साधारणत: ऑक्टोबर-नोव्हेंबरनंतर आणि सर्वाधिक कांदा डिसेंबर व जानेवारीत बाजारात येतो.

१५ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या काळात सर्वाधिक कांदा लागवड झाला आहे. तीन महिन्यानंतर तो कांदा बाजारात विक्रीसाठी येईल. गतवर्षी जिल्ह्यातील कांदा बाजारात आल्यानंतर मार्चमध्ये निर्यातबंदी झाली आणि कांद्याचे दर गडगडले. निर्यातबंदीपूर्वी कांद्याला सात हजार रुपयांपर्यंत भाव मिळत होता. पण, भाव कमी झाल्यावर हजारो शेतकऱ्यांनी बंगळुर बाजारात कांदा विकला. यंदा निर्यातबंदी होणार नाही या आशेने जिल्ह्यात यंदा गतवर्षीपेक्षा जास्त कांदा लागवड झाला आहे.

सध्या कांद्याला ३ ते ५ हजाराचा दर

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला प्रतिक्विंटल तीन ते पाच हजार रुपयांचा दर मिळत आहे. दररोज बाजार समितीत ८० ते ११० गाड्या कांद्याची आवक होत आहे. कर्नाटकातून आता पांढरा कांदा विक्रीसाठी येत असून ऑक्टोबरमध्ये नियमित कांदा विक्रीसाठी येईल. सोलापूर जिल्ह्यातील कांदा देखील ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये विक्रीसाठी येतो. यावर्षी कांद्याला सरासरी तीन हजार रुपयांचा भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Flight Tickets Prices : सोलापूरहून मुंबई, गोवा विमान प्रवासाचे तिकीट दर जाहीर

Ballot Paper Petition : ‘बॅलेट पेपर’बाबतची याचिका फेटाळली

Mango Production : सातपुड्यात आंब्यांच्या चांगल्या उत्पादनाची अपेक्षा

Maharashtra Politics : फडणवीस यांच्या नावाची घोषणा लांबल्याने समर्थकांत अस्वस्थता

Co-Generation Subsidy : सात कारखान्यांच्या सहवीज प्रकल्पांना अनुदान नाकारले

SCROLL FOR NEXT