Soil Testing Agrowon
ॲग्रो विशेष

Soil Testing : सांगली जिल्ह्यात ६ हजार माती नमुन्यांची तपासणी; सेंद्रिय घटक कमी!

Soil Health : सांगली जिल्ह्यात विविध योजनेतून सन २०२४-२५ या वर्षात १५०७२ मातीचे नमुने प्राप्त झाले असून, ६ हजार ६९६ माती परीक्षण करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने सेंद्रिय कर्ब आणि नत्र घटकाचे प्रमाण कमी असल्याचे माती तपासणीतून समोर आले आहे.

Team Agrowon

Sangli News : सांगली जिल्ह्यात विविध योजनेतून सन २०२४-२५ या वर्षात १५०७२ मातीचे नमुने प्राप्त झाले असून, ६ हजार ६९६ माती परीक्षण करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने सेंद्रिय कर्ब आणि नत्र घटकाचे प्रमाण कमी असल्याचे माती तपासणीतून समोर आले आहे. त्यानुसार माती परीक्षणाचा अहवालात कोणत्या खतांचा वापर केला पाहिजे याच्या शिफारशीही शेतकऱ्यांना देण्यात आली, असल्याची माहिती जिल्हा मृद्‍ सर्व्हेक्षण मृत चाचणी विभागाने सांगितले.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊस, फळबाग, भाजीपाला याचे उत्पादन घेतले जाते. जमिनीची भूक न ओळखता शेतकऱ्यांकडून केवळ पिकांच्या वाढीसाठी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसतो आहे. परिणामी, जमिनीचे आरोग्य धोक्यात येऊन शेती आणि शेतकरी अडचणीत येऊ लागले आहेत. त्यामुळे जिल्हा मृदा चाचणी विभाग माती परीक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांच्यात जागृती करत आहे.

राष्ट्रीय कृषी विकास, राष्ट्रीय अन्नसुरक्षा खरीप हंगाम, रब्बी हंगाम, मूल्यसाखळी योजना, भात सुधार प्रकल्प आणि सेंद्रिय शेती योजना या योजनांच्याद्वारे माती परीक्षण केले जाते. जिल्ह्यात सन २०२४-२५ या वर्षात १७ हजार ७८९ नमुने संकलित करण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी डिसेंबर अखेर १५ हजार ७२ नमुने प्राप्त झाले आहेत. ६ हजार ६९६ माती नमुन्यांची तपासणी केली आहे.

या शेतकऱ्यांना पिकांच्या खतांच्या शिफारशीसह आरोग्य पत्रिका वितरित करण्यात आल्या आहेत. मृदा चाचणी विभागात माती नमुना यामध्ये सामू, विद्युत वाहकता, सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद, पालाश, तर सूक्ष्म मूलद्रव्य नमुना तपासणीमध्ये तांबे, लोह, मॅंगेनीज, झिंक आणि पिकासाठी पाणी नमुना तपासणीमध्ये सामू, विद्युत वाहकता, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, सोडियम, क्लोरिन, कार्बनिट, कायकार्बनिट, सल्फेट, एकूण विद्राव्य क्षार सोडिअमचे इतर कटायनाचे प्रमाण तपासले जाते.

माती नमुना

पीकनिहाय प्रकार

सर्वसाधारण पिकांसाठी ३० सेंटिमीटर खड्डा घ्यावा.

फळपिकांसाठी ३ फुटांपर्यंतचा खड्डा घ्यावा.

कोणत्या मातीचे घेऊ नये..

जनावरे बांधण्याची व झाडाखालची जागा

शेणखत, पालापाचोळा टाकण्याची जागा

पाण्याच्या पाटाची जागा

शेतकऱ्यांमध्ये माती परीक्षण करण्यासाठी जागृती वाढली आहे. त्यामुळे शेतकरी माती परीक्षण करून जमिनीची सुपीकता ठेवण्यासाठी पुढाकार घेत आहेत.
निरंजन देसाई, जिल्हा मृत सर्वेक्षण, मृद चाचणी अधिकारी, सांगली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Haryana Wheat Procurement : हरियाणा गहू खरेदीवरून काँग्रेस आक्रमक; नव्या नियमामुळे शेतकरी अडचणीत, सरकारवर आरोप

Fertilizers Price: खतांच्या किमती वाढतील का?, मंत्री बावनकुळे यांचा मोठा खुलासा

Water Footprint Policy: जाणून घ्या देशाचे दरडोई जलपदचिन्ह

India’s Dependence On Imports: सोनाराने टोचले कान; पण फलित काय?

State Assembly Elections: निवडणूक राज्याची, लक्ष ‘दिल्ली’कडे

SCROLL FOR NEXT