Monsoon Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Monsoon Update: जूनचे पहिले दोन आठवडे मॉन्सून मंदावणार

June Monsoon Forecast: यंदा मॉन्सून मे महिन्यात वेगाने देशात पोहोचला, मात्र जूनच्या पहिल्या पंधरवडीत त्याची गती मंदावण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील दोन आठवड्यांसाठी पावसात खंड पडण्याचा इशारा दिला आहे.

Team Agrowon

Pune News: नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी यंदा वेगवान आगमन करत देशात लवकर पदार्पणाचा एक नवा आयाम रचला. मे महिन्यात कोसळलेला पाऊस देखील उच्चांकी नोंद करण्याच्या मार्गावर आहे. मात्र प्रवाह मंदावल्याने पुढील चाल अडखळणार आहे. पुढील दोन आठवडे विशेषतः जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यासह देशात पाऊस दडी मारण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

यंदा अंदमान, निकोबार बेटांसह, केरळ आणि महाराष्ट्रात मॉन्सूनने अतिशय वेगाने प्रगती केली. साधारणतः जूनमध्ये पोचणाऱ्या मॉन्सूनने यंदा मे महिन्यातच महाराष्ट्रासह देशाच्या बऱ्याच भागात मजल मारली आहे. मॉन्सूनने दक्षिण भारतासह महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा, पूर्वोत्तर राज्ये आणि सिक्कीम, पश्चिम बंगालच्या काही भागांपर्यंत धडक दिली आहे. मॉन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी मात्र वाट पाहावी लागण्याची चिन्हे आहेत.

मे महिन्यात पूर्वमोसमी पावसाने तडाखा दिला. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेली कमी दाबाची क्षेत्रे, उत्तर भारतातील पश्चिम चक्रावातांचा मध्य भारतापर्यंत दिसून आलेला प्रभाव यातच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून झालेला बाष्पाचा पुरवठा यामुळे मे महिन्यात महाराष्ट्रासह देशात प्रथमच विक्रमी पाऊस कोसळला. शुक्रवारपर्यंत (ता. ३०) देशासह महाराष्ट्रात आतापर्यंतच्या सर्वांत उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात सरासरी तब्बल १७२.६ मिलिमीटर, तर देशभरात सरासरी १७५.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. महिनाअखेर या आकडेवारीत आणखी वाढ होणार आहे.

बुधवारी महाराष्ट्राच्या विदर्भात काहीशी प्रगती केल्यानंतर मॉन्सूनची वाटचाल थांबली आहे. ५ जूनपर्यंत महाराष्ट्राच्या आणखी काही भागात प्रगती होण्यासाठी पोषक हवामान नाही. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात विशेष म्हणजे १ ते ५ जूनपर्यंत देशाची पश्चिम किनारपट्टी, मध्य भारत, पूर्वोत्तर राज्ये आणि पूर्व भारतात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा शक्यता असली तरी पावसाचा जोर ओसरणार आहे.

६ ते १२ जूनपर्यंत देशाच्या बहुतांश भागात पाऊस दडी मारण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. महाराष्ट्राचा विचार करता ३० मे ते ५ जून या कालावधीत कोकण, विदर्भात सरासरीपेक्षा अधिक, मध्य महाराष्ट्रात सरासरीइतका तर मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ६ ते १२ जून या कालावधीत देशाच्या बहुतांश भागात पावसात खंड पडणार असून, कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसात तूट पडणार आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातही सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Solar Pump : सोलरही नाही अन् पैसेही परत मिळेना

Agriculture Scheme: शेतीसाठी यंत्र खरेदीवर कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ५०% अनुदान; ऑनलाईन अर्ज कसा करायचा जाणून घ्या

Cotton Crop Loss : अति पावसाने कपाशीचे पीक गेले हातातून

Jayakwadi Dam Water Release : ‘जायकवाडी’तून गोदावरीत ९४३२ क्युसेक पाण्याचा विसर्ग

Thailand-Cambodia War : आता थायलंड-कंबोडियात संघर्ष

SCROLL FOR NEXT