Monsoon Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon 2024 : मॉन्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर

Team Agrowon

Pune News : नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) अरबी समुद्रातून मजल-दरमजल वाटचाल सुरू ठेवली आहे. सलग तिसऱ्या दिवशी आणखी चाल करत मॉन्सूनने गोव्यात धडक दिली आहे. मॉन्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर पोचला असून, दोन दिवसांत मोसमी वारे राज्याचे प्रवेशद्वार असलेल्या तळ कोकणात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

अरबी समुद्रातून प्रवाहाचा वेग अधिक बळकट होत असल्याने मोसमी वारे उत्तरेच्या दिशेने कूच करत आहे. याआधी केरळमध्ये वेळेआधी (३० जून) दाखल झाल्यानंतर वेग धरलेल्या मॉन्सूनने सलग तिसऱ्या दिवशी आणखी धाव घेतली आहे.

रविवारी (ता. २) संपूर्ण केरळ, तमिळनाडू व्यापून वाऱ्यांनी दक्षिण कर्नाटकमधील मंगळुरू, चित्रदुर्ग ते आंध्र प्रदेशातील नेल्लूर पर्यंतच्या भागापर्यंत मजल मारली होती. सोमवारी (ता. ३) कर्नाटकातील होन्नावर, बेल्लारी आंध्र प्रदेशातील कर्नूल, तेलंगणातील नरसापूर पर्यंत प्रगती केली.

मंगळवारी (ता. ४) सर्वसाधारण वेळेच्या एक दिवस आधीच मॉन्सूनने गोव्यासह, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे. मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान असल्याने दोन ते तीन दिवसांत कर्नाटक, गोव्याच्या उर्वरित भाग, तेलंगणा, आंध्र प्रदेशचा आणखी काही भाग, दक्षिण महाराष्ट्र, छत्तीसगड आणि ओडिशाच्या दक्षिण भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT