Monsoon Update Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Rain : माॅन्सूनची विदर्भात मुसंडी; राज्याच्या अनेक भागात ४ दिवस पावसाचा अंदाज

Weather News : माॅन्सूनने राज्यातील आपली वाटचाल कायम ठेवत आणखी काही भाग व्यापला. तर माॅन्सूनच्या वाटचालीसाठी आजूनही पोषक वातावरण आहे.

Team Agrowon

Pune News : माॅन्सूनने राज्यातील आपली वाटचाल कायम ठेवत आणखी काही भाग व्यापला. तर माॅन्सूनच्या वाटचालीसाठी आजूनही पोषक वातावरण आहे. राज्याच्या अनेक भागात पाऊस पडत असून पुढच्या ४ दिवसांमध्येही काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

माॅन्सूनने आज राज्यातील आणखी काही भागात प्रवेश केला. माॅन्सूनने आज विदर्भात प्रगती केली. आज माॅन्सून अमरावती आणि चंद्रपूरपर्यंत पोचला. माॅन्सूनने आता संपूर्ण मराठवाडा व्यापला.

तसेच संपूर्ण कोकण, पश्चिम महाराष्ट्र व्यापला आहे. माॅन्सूनने आज तेलंगणाचा संपूर्ण भाग व्यापला. तसेच छत्तीसगडच्या आणखी काही भागात माॅन्सून पोचला. माॅन्सूनची सिमा आज नवसारी, जळगाव, अमरावती, चंद्रपूर, बिजापूर, सुकमा, मलकानगरी आणि विजयानगरम या भागात होती. 

माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढीच्या ३ ते ४ दिवसांमध्ये माॅन्सून ओडिशा, किनारी आंध्र प्रदेश आणि बंगालच्या उपसागरात आणखी काही ठिकाणी प्रगती करेल, असा अंदाजही हवामान विभागाने दिला. 

हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज दिला. विदर्भात पुढील ४ चार ठिकठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर आज आणि उद्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवड्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT