Monsoon 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Update : मॉन्सूनची बहुतांशी अंदमानात प्रगती

Monsoon 2024 : नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी (ता. २२) वेगाने वाटचाल करत अंदमान निकोबार बेटसमूहाच्या बहुतांशी भागात प्रगती केली आहे.

Team Agrowon

Pune News : नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी (ता. २२) वेगाने वाटचाल करत अंदमान निकोबार बेटसमूहाच्या बहुतांशी भागात प्रगती केली आहे. तर अरबी समुद्रातून पुढे चाल करत श्रीलंकेचा जवळपास निम्मा भूभाग व्यापला आहे. उर्वरित अंदमान बेटांसह बंगालच्या उपसागरात मॉन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान आहे.

अंदमान-निकोबार बेटसमूह आणि मालदीवमध्ये रविवारी (ता. १९) मॉन्सूनचे आगमन झाले. बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली असून, अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. बुधवारी (ता. २२) संपूर्ण निकोबार बेटे आणि उत्तर अंदमान बेटांवरील माया बंदर पर्यंतच्या भागात मॉन्सून पोहोचला आहे.

तर अरबी समुद्रातून प्रगती करत मालदीवचा आणखी काही भाग, कोमोरिन समुद्राचा भाग आणि श्रीलंकेच्या निम्म्या भूभागात मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.

मॉन्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याने अंदमान बेट समूहाच्या उर्वरित भागासह पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात मॉन्सून दाखल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. दरम्यान, मॉन्सूनचे केरळमधील आगमनही लवकर होत ३१ पर्यंत भारताच्या मुख्य भूमीवर दाखल होण्याची शक्यता आहे. वेगाने सुरू असलेली वाटचाल पाहता मॉन्सूनच्या केरळातील आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कमी दाब क्षेत्राची निर्मिती

नैॡत्य बंगालच्या उपसागरात उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. ईशान्य दिशेकडे सरकत असलेल्या प्रणालीचे उद्यापर्यंत (ता. २४) तीव्र कमी दाब क्षेत्रात (डिप्रेशन) रूपांतर होणार आहे. या प्रणालीची तीव्रता वाढून चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Produce Policy: शासनाने शेतीमालाच्या किमती टिकवून ठेवणारे धोरण राबवावे : उदय देवळाणकर

Swachh Bharat Mission: घनकचरा व्यवस्थापनातून दिला ‘जन-आधार’

Farm Roads: कारंजा तालुक्यात महिनाभरात ४४ रस्ते शेतकऱ्यांसाठी खुले

Seeds Germination: बियाण्यांच्या उगवणक्षमतेवर परिणाम करणारे घटक

Agriculture Department Raids: परवाना संपूनही बेकायदेशीर विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर छापा

SCROLL FOR NEXT