Cooperation Minister Babasaheb Patil Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Assembley Session: सावकारांचा जमीन हडपण्याचा प्रयत्न

Cooperation Minister Babasaheb Patil: राज्यातील खासगी सावकारांविरोधात १० हजारांवर तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी ८१०० तक्रारींत तथ्य नव्हते. मात्र, सावकारांनी ७७१ हेक्टर जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत बुधवारी (ता. १६) दिली.

बाळासाहेब पाटील

Mumbai News: राज्यातील खासगी सावकारांविरोधात १० हजारांवर तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी ८१०० तक्रारींत तथ्य नव्हते. मात्र, सावकारांनी ७७१ हेक्टर जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत बुधवारी (ता. १६) दिली.

ही जमीन सहकार विभागाने कार्यवाही करून शेतकऱ्यांना परत दिली आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांची कागदपत्रे पूर्ण असूनही बँकांनी कर्जपुरवठा केला नाही त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही श्री. पाटील म्हणाले.

या संदर्भात वणीचे आमदार संजय दरेकर आणि विक्रमगडचे आमदार हरिश्चंद्र भोये यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात अवैध सावकारी सुरू असून व्याजाने पैसे देऊन शेतकऱ्यांच्या जमिनी व मालमत्ता बेकायदेशीर हडप केल्याप्रकरणी चंद्रपूर पोलिस ठाण्यात २९ जानेवारी रोजी दोघांविरोधात तक्रार केली हे खरे आहे का? असा प्रश्न केला. मात्र, यात तथ्य नसल्याचे सहकारमंत्र्यांनी सांगितले.

या चर्चेत भाजपचे समीर कुणावार, काँग्रेसचे अमित देशमुख यांच्यासह अन्य सदस्यांनी अवैध सावकारीबाबत चिंता व्यक्त करत कारवाईची मागणी केली. श्री. कुणावार म्हणाले, की राज्यात अनेक ठिकाणी सावकार शेतकरी अडचणीत असताना कर्ज देतात आणि इसारपत्राच्या नावाखाली जमिनीचे खरेदीपत्र करून घेतले जाते. तक्रार झाल्यानंतर तहसीलदारांमार्फत जमीन परत केली जाते.

मात्र, अशा तक्रारी आल्या तर कडक कारवाई सुरू केली पाहिजे. अनेक प्रकरणे अजून सुरू आहेत. सावकार रोख पैसे देतो. त्यामुळे रोख पैसे देऊन खरेदी विक्री व्यवहार कसे काय होऊ शकतात? ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. यावर मंत्री पाटील म्हणाले, की जेथे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत तेथे गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत केली जाईल.प्रशांत बंब यांनी शेतकऱ्यांची कागदपत्रे पूर्ण असूनही कर्ज दिले जात नाही अशा बँकांवर कारवाई करण्याची मागणी केली. ती मंत्री पाटील यांनी मान्य केली.

सावकारांचे महिलांवर अत्याचार : अमित देशमुख

आमदार अमित देशमुख म्हणाले, की लातूर शहर आणि ग्रामीण भागात वित्तीय संस्थांमार्फत अर्थपुरवठा होत नाही. अवैध सावकारीचा सुळसुळाट झाला आहे. अव्वाच्या सव्वा व्याजदराने कर्जपुरवठा होतो. ग्राहक पैसे व्याज भरू शकत नाही तेव्हा त्याच्या कुटुंबाचा छळ होतो. दमदाटी केली जाते. मारहाण केली जाते, सामान बाहेर फेकले जाते. महिलांना अत्याचार करण्याच्या धमक्या दिल्या जातात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jammu Kashmir Cloudburst: ढगफुटीत अकरा जणांचा मृत्यू

Maratha Reservation Protest: मराठवाड्यातील मराठे हे कुणबीच, मुदतवाढ नाहीच!

Onion Market: आंध्र सरकारकडून कांद्याची १,२०० रुपयांना खरेदीची तयारी

Onion Payment Delay: कांद्याच्या पैशांसाठी सणासुदीला वणवण

Maharashtara Rain Forecast: विदर्भासह, मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT