Drought Condition Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Condition : बुलडाणा, लोणार तालुक्यांतील १९ गावांमध्ये ‘मध्यम दुष्काळ’

Water Scarcity : यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीतील पावसात तूट निर्माण झाल्याने भुजलाची कमतरता झाली आहे.

Team Agrowon

Buldana News : जिल्ह्यातील लोणार व बुलडाणा तालुक्यांतील १९ गावांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ प्रशासनाने जाहीर केला आहे. यापूर्वी जिल्ह्यात ७३ महसूल मंडलांमध्ये दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा करण्यात आलेली आहे.

यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीतील पावसात तूट निर्माण झाल्याने भुजलाची कमतरता झाली आहे. दूरसंवेदनविषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पिकाची स्थितीचा विचार करून जिल्ह्यात यापूर्वी दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा झाली होती.

खरीप हंगामात दुष्काळाचे मूल्यांकन केल्यानंतर बुलडाणा व लोणार तालुक्यांतील १९ गावांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामध्‍ये साखळी बुद्रुक, गोंधनखेड, चांडोळ, उमरखेड, हतेडी बुद्रुक, बोरखेड, गिरडा, मासरुळ, पांगरखेड, जांभरुण तसेच लोणार तालुक्यातील भिवापूर, धाड, गुंजापूर, कासारी, कौलखेड, खंडाळा, खापरखेड, राजनी, अंजनी खुर्द यांचा समावेश आहे. तर चिखली तालुक्यातील अमडापूर, उंद्री, एकलारा, कोलारा, मेरा खुर्द.

धोडप, पेठ, शेलगाव आटोळ, चांदई, चिखली, हातणी. देऊळगावराजा तालुक्यातील देऊळगाव राजा, देऊळगाव मही, तुळजापूर, मेहुणा राजा, अंढेरा, मेहकर तालुक्यातील मेहकर, जानेफळ, हिवराआश्रम, डोणगाव, देऊळगाव माळी, वरवंड, लोणी गवळी, अंजनी बुद्रुक, नायगाव दत्तापूर, सिंदखेडराजा तालुक्यातील सिंदखेडराजा, किनगाव राजा, मलकापूर पांग्रा, दुसरबीड, सोनोशी, शेंदुरजन, साखरखेर्डा यांचा समावेश आहे.

मलकापूर ः जांभूळ धाबा, दाताळा, धरणगाव, मोताळा ः मोताळा, बोराखेडी, धामणगाव बढे, पिंप्री गवळी, रोहिणखेड, पिंपळगाव देवी, शेलापूर बुद्रुक, नांदुरा ः नांदुरा, वडनेर, शेंबा, निमगाव, चांदुरबिस्वा, महाळुंगी, खामगाव ः खामगाव, पिंपळगाव राजा, लाखनवाडा, हिवरखेड, काळेगाव, आवार,

अटाळी, पळशी बुद्रुक, आडगाव, वझर, पारखेड, शेगाव ः माटरगाव, जलंब, जवळा बुद्रुक, मनसगाव, जळगाव जामोद ः जामोद, पिंपळगाव काळे, वडशिंगी, आसलगाव, जळगाव, संग्रामपूर ः संग्रामपूर, सोनाळा, बावनबीर, पातुर्डा आणि कवठळ या मंडलांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT