E-Rikshaw  Agrowon
ॲग्रो विशेष

Self Help Group : व्यवसायासाठी बचत गटांना फिरत्या ई-रिक्षा

Mobile E-Rikshaw : बचतगटांमुळे गावातील महिलांना रोजगार मिळाला असून कमी खर्चात अन्न, पाण्याच्या सुविधा मिळत असल्‍याने पर्यटकही आनंदात आहेत.

Team Agrowon

Alibaug News : रायगड जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायात महिला बचत गटांनी चांगलेच बस्तान मांडले आहे. बचतगटांमुळे गावातील महिलांना रोजगार मिळाला असून कमी खर्चात अन्न, पाण्याच्या सुविधा मिळत असल्‍याने पर्यटकही आनंदात आहेत.

अपंग व्यक्ती व बचत गटांच्या या प्रयत्नांना रायगड जिल्हा परिषदेनेही अनुदानातून व्यवसायासाठी ई- रिक्षा टेम्पो उपलब्‍ध करून दिले आहेत. त्‍यामुळे रोजगारात भर पडेल, असा आशावाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेबाड यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यात ग्रामीण भागातील दिव्यांगासह बचत गटांना व्यवसायाच्या माध्यमातून उभारी देण्याचा प्रयत्न रायगड जिल्हा परिषदेने केले आहे. तीन वर्षांपासून असलेला अखर्चित निधी दिव्यांगासह बचत गटांना स्वयंरोजगारासाठी खर्च केला जाणार आहे. त्यांना अद्ययावत सोयी सुविधांयुक्त ई-रिक्षा टेम्पो शंभर टक्के अनुदानातून दिला जाणार आहे.

जिल्ह्यात १७ हजारांहून अधिक दिव्यांग असून, दोन हजारांहून अधिक महिलांचे वेगवेगळे बचतगट गावपातळीवर तयार झाले आहेत. वाढते नागरिकरण, पर्यटन व औद्योगीकरणात दिव्यांग व महिला बचत गटांना स्वयंरोजगाराचे साधन खुले करण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी एक वेगळा उपक्रम हाती घेतला आहे.

दिव्यांगांसह बचत गटांना फिरते ई-रिक्षा टेम्पो शंभर टक्के अनुदानातून दिले जाणार असून ७० हून अधिक लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी साडेचार कोटींचा खर्च होणार आहे. तालुकास्तरावर सोडत पद्धतीने ई-रिक्षाचे वितरण केले जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Entrepreneur: महिलांना व्यवसाय सुरू करण्याची सुवर्णसंधी; केंद्र सरकारच्या या ७ महत्त्वाच्या योजना जाणून घ्या

Mango Fruit Cover: निर्यातक्षम दर्जेदार आंबा उत्पादनासाठी उपाय 'फ्रुटकव्हर'

Banana Price Drop: युध्दाचा खानदेशातील केळीला फटका; निर्यात ठप्प झाल्याने भावातही घसरण

PM Kisan Scheme: पीएम किसान योजनेतून तुमचे नाव वगळले ! हप्ता येण्यापूर्वी करा याची तपासणी 

Agriculture Corruption Case: कृषी खरेदी प्रकरणात धनंजय मुंडेंना लोकायुक्तांकडून दिलासा; अंजली दमानियांची तक्रार फेटाळली

SCROLL FOR NEXT